नवी दिल्ली
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अटलांटा येथे G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी डिसेंबर महिन्यातील कॅनडा दौऱ्याबाबत चर्चा केली. हा दौरा भारत आणि कॅनडाच्या संबंधांमधील एक अत्यंत महत्त्वाचा 'बिल्डिंग ब्लॉक' ठरेल, अशी सहमती यावेळी व्यक्त करण्यात आली.
अधिकृत निवेदनानुसार, दोन्ही मंत्र्यांनी भारत-कॅनडा सहकार्यातील स्थिर वाढीचा आढावा घेतला आणि या दौր्यापूर्वी संपर्कात राहण्याचे मान्य केले. या महिन्याच्या सुरुवातीला कॅनेडियन परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती, जिथे व्यापार, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ११ आणि १२ डिसेंबर रोजी कॅनडाचा दौरा करणार असून, टोरांटो आणि ओटावा येथे त्यांचे कार्यक्रम होणार असल्याची पुष्टी भारतीय उच्च आयोग आणि कॅनेडियन पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये काही मुद्द्यांवरवरून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते, परंतु गेल्या काही महिन्यांत राजनैतिक स्तरावर संबंध पुन्हा रुळावर येत आहेत