काश्मीरच्या मुद्दसिर अहमद शेख यांना मिळाले मरणोत्तर शौर्य चक्र

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
शहीद मुद्दसिर अहमद शेख
शहीद मुद्दसिर अहमद शेख

 

 ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सशस्र दलातील जवानांसाठी ४१२ शौर्य पुरस्कार आणि इतर संरक्षण सन्मान जाहीर केले होते. त्यामध्ये शाहिद कॉन्स्टेबल अहमद शेख आणि जम्मू काश्मीरचे शहीद नाईक जसबीर सिंग यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. 


२५ मे २०२२ रोजी उत्तर काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यात पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली . यावेळी झालेल्या चकमकीत हवालदार मुद्दसिर शहीद झाले होते. ते पोलीस आणि भारतीय लष्कराच्या ५२ RR या गुप्त संघाचे सदस्य होते. या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ३ दहशतवादी मारले गेले. 


चकमकीच्या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या चकमकीमध्ये मुद्दसिर अहमद शेख हे गोळी लागून शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीर दौऱ्यावर असताना त्यांनी मुद्दसिरच्या घरी भेट दिली होती. त्यांच्या मागे मकसूद शेख, आई शमीमा बेगम, दोन बहिणी आणि तीन भाऊ असा परिवार आहे. ते सर्व भावंडांमध्ये वयाने मोठे होते. 


पदवी पूर्ण झाल्यानंतर मुद्दसिर यांनी आरोग्य विभागात काम केले पण त्यानंतर ते जम्मू काश्मीर पोलिसांमध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते डीपीएल बारामुल्ला येथे तैनात होते. त्त्यांची पोलीस हवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.