भारताच्या ‘मिशन गगनयान’ला वेग

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
गगनयान मोहीम
गगनयान मोहीम

 

 भारताने गगनयान मोहिमेसाठी अंतराळ संशोधन संस्था आणि नौदलाच्या मदतीने या मोहिमेची तयारी चालू आहे. या दोन संस्थांच्या मदतीने अंतराळवीरांसाठीच्या कुपीच्या येथील ‘वॉटर सर्व्हायव्हल टेस्ट फॅसिलिटी सेंटर’मध्ये प्रारंभिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या कुपीच्या चाचण्या नौदलाच्या केंद्रामध्ये घेतल्या जाणार आहेत. याबाबतची अधिक माहिती ‘इस्रो’कडून देण्यात आली आहे. या रिकव्हरी मोहिमेमध्ये अन्य सरकारी संस्था सहभागी होणार आहेत. 


भारताची गगनयान मोहीम ३ दिवसांची असणार आहे. या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या अंतराळवीरांना पृथ्वीच्या चारशे किलोमीटर पर्यंत कक्षेत नेता येणार आहे. पृथ्वीवर गे अंतराळवीर येतील तेव्हा त्यांची कुपी समुद्रामध्ये उतरणार आहे. फार कमी वेळेत संशोधकांना ही कामगिरी पार पाडावी लागणार आहे. वेग वेगळ्या परिस्थितीत ही रिकव्हरी योग्य पद्धतीत पार पडावी म्हणून अनेक चाचण्या घेतल्या जातात. अंतराळवीर आणि कुपी किती कालावधीत पूर्ववत होते यावर प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करणे गरजेचे आहे. या यानाच्या पहिल्या टप्यातील चाचण्या बंदिस्त तलावामध्ये घेण्यात आल्या. पण यानंतर होणाऱ्या चाचण्या समुद्रात होणार असल्याचे ‘इस्रो’कडून सांगण्यात आले.



फिडबॅकनंतर होणार सुधारणा

या चाचण्यानंतर अंतराळवीरांकडून जो फिडबॅक आणि माहिती मिळेल त्याचा लाभ प्रमाणित कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी होईल, त्याच्या आधारेच उपकरणांमध्ये सुधारणा करण्यात येतील तसेच प्रशिक्षणाचा आराखडा देखील निश्चित करण्यात येईल असे ‘इस्रो’ने म्हटले आहे. भविष्यातील प्रभावशाली प्रक्षेपक तयार करण्यासाठी त्या अनुषंगाने ‘विकास’ या इंजिनाच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. या थ्रॉटेबल इंजिनाच्या चाचण्यांतून सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत.



चाचण्या घेऊन करणार सुधारणा 

या चाचण्यांमधून आंतराळवीरांकडून फीडबॅक घेतला जाणार आहे. त्याच माहितीच्या आधारे कार्यपद्धतीत सुधारणा केली जाणार आहे. त्याचा आधार घेऊनच उपकरणांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. याचा प्रशिक्षणाचा आराखडा म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. याबाबत भविष्यातील प्रभावशाली प्रक्षेपक तयार करण्यासाठी इंजिनाच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत.  या थ्रॉटेबल इंजिनाच्या चाचण्यांतून सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत.