AI मुळे मोठ्या संधी!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
 आर्टिफिशियल इंटेलिजन्स
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

 

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे अभ्यासाचे आधुनिक क्षेत्र निर्माण झाले आहे. सांख्यिकी, संज्ञानात्मक विज्ञान आणि संकलन आणि माहिती विज्ञान यांसारख्या विविध विभागांमधल्या वैज्ञानिक पद्धती, प्रक्रिया आणि तंत्रांचा वापर केला जातो. उत्तमरीत्या संकलित केलेल्या, तसेच विविध ठिकाणी विखुरलेल्या डेटामधून उपयुक्त माहिती एकत्रित जमा करण्याशी हे क्षेत्र संबंधित आहे.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, अशा कयास लावला जातो. मात्र ब्लुमबर्गनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नवीन संधी निर्माण होणार आहे. शिवाय, यातील जाणकारांना फायदा होईल, असं सांगण्यात येत आहे.

 

AI मधून चांगले परिणाम मिळविण्यासाठी आणि कंपन्यांना त्यांच्या कामगारांना टूल्सचा वापर करण्यास प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी “तज्ज्ञ अभियंत्यांची गरज भासणार आहे. या अभियंत्यांना ३३५,०००  डॉलरपर्यंत पगार मिळू शकतो, असंही ब्लुमबर्गने म्हटलं आहे.

 

 

 

रिक्रुटर्सनुसार, ही फील्ड वेगाने विकसित होत आहे. तसेच मुख्य उमेदवारांना संगणक अभियांत्रिकी पदवी आवश्यक असणार नाही.