फ. म. शहाजिंदे
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शांतीवन (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे एप्रिल महिन्यात संमेलन होणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत नियोजित ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी फ. म. शहाजिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. या साहित्य संमेलनासाठी 'शांतीवन'चे संस्थापक दीपक नागरगोजे यांचे निमंत्रण होते. त्यांच्या शांतीवन प्रकल्प आर्वी, ता. शिरूर कासार या सेवाभावी संस्थेत एप्रिल महिन्यात संमेलन होईल.
शहाजिंदे यांचे 'निधर्मी', 'आदम', 'ग्वाही', 'झोंबणी', 'शब्दबिंब' इत्यादी 'इत्यर्थ', समीक्षाग्रंथ; 'अनुभव' 'मराठवाड्यातील कविता', 'पुरचुंडी', 'मूठभर माती आशय व अन्वयार्थ', 'मुस्लिम मराठी साहित्यः प्रेरणा आणि स्वरूप' ही संपादने प्रसिद्ध आहेत. यापूर्वी ते पाचवे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, वाकुळणी, जि. जालना, पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सोलापूर, अकरावे अंकुर साहित्य संमेलन, लोणार, जि. बुलडाणा, पहिले लातूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन, निलंगा, पाचवे पुरोगामी मराठी साहित्य संमेलन, कंधार या संमेलनांची अध्यक्षपदे भूषविलेली आहेत.
कवी केशवसुत काव्य 'वाकळ', 'प्रत्यय', हे लेखसंग्रह; 'शेतकरी' इत्यादी कवितासंग्रह; 'मी तू' ही कादंबरी तर 'सारांश' पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा अंबाजोगाई साहित्य पुरस्कार, हमीद दलवाई साहित्य पुरस्कार, मारुती मगर साहित्य सेवा पुरस्कार, तुका म्हणे साहित्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या दीर्घ वाङ्मयीन लेखनाचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे, असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते, डॉ. दीपा क्षीरसागर व कार्यकारिणी सदस्य कुंडलिक अतकरे, प्रा. किरण सगर, दगडू लोमटे, देवीदास फुलारी, डॉ. हेमलता पाटील, डॉ. ऋषीकेश कांबळे, डॉ. संजीवनी तडेगावकर, सरोज देशपांडे, संजीव कुलकर्णी, सुभाष कोळकर, विलास सिंदगीकर, डॉ. समिता जाधव, श्रीधर नांदेडकर, डॉ. हंसराज जाधव, डॉ. दिलीप बिरुटे, प्रभाकर साळेगावकर, मोहिब कादरी उपस्थित होते.
फ. म. शहाजिंदे यांच्याविषयी...
फ. म. शहाजिंदे यांचा जन्म ३ जुलै १९४६ मध्ये उस्मानाबाद येथे झाला. त्यांचे शिक्षण सास्तूर येथील पहिली ते दहावी शांतेश्वर विद्यालयात झाले. त्यांनतर त्यांनी औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयात बी. ए. (इंग्रजी माध्यम) केले, तर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातून एम. ए. पूर्ण केले. त्यांच्या नोकरीची वाटचाल मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातून सुरु केली. औराद शहाजनी येथे मराठी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले आणि २००६ ला ते सेवानिवृत्त झाले.
साहित्यविश्वात गौरव
फ. म. शहाजिंदे यांना त्यांच्या साहित्यसेवेसाठी कवी केशवसूत राज्य पुरस्कार (१९८१-८२), यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, अंबेजोगाई (१९९४), हमीद दलवाई पुरस्कार, मुंबई (२००२), तुका म्हणे साहित्य पुरस्कार, बुलढाणा (२००७), सुशीलकुमार शिंदे साहित्य गौरव पुरस्कार, सोलापूर इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. शहाजिंदे यांच्या अनेक कवितांचा हिंदी, इंग्रजी भाषेतून अनुवाद झाला असून, त्यांच्या कविता अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.