भारताच्या स्वातंत्र्योत्तर दशकातील ५ युवा प्रेरणास्थान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 25 d ago
सत्यजित राय, मिल्खा सिंग, दारा सिंग
सत्यजित राय, मिल्खा सिंग, दारा सिंग

 

१९५०चे दशक स्वातंत्र्यानंतरचे पहिले दशक. त्यावेळी भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कला, चित्रपट, क्रीडा आणि शिक्षण वसाहतीच्या जाचातून मुक्त झाले. नव्या स्वतंत्र राष्ट्राला अनुसरण्यासाठी नवे नायक आणि आदर्श करण्यासाठी नव्या कल्पनांची गरज होती. ही आहे १९५० च्या दशकातील पाच युवा आदर्शांची माझी निवड.  

नर्गिस :

आदर्श भारतीय स्त्री कशी असावी? हा प्रश्न विचारल्यास बहुतांश लोकांचं उत्तर असेल - मदर इंडिया. हा रोल नर्गिसने समान नावाच्या चित्रपटात साकारला आहे. विसाव्या वाढदिवसापूर्वी नर्गिसने ‘अंदाज’ आणि ‘बरसात’ या १९४९ मधील यशस्वी चित्रपटांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील राणी म्हणून स्थान मिळवले आहे.

 
‘आवारा’ चित्रपटाने त्यांची लोकप्रियता भारताबाहेर पोहोचली आहे. या चित्रपटाने नर्गिस आणि राज कपूर यांना सोव्हिएत युनियनमध्ये स्टार्स  बनवले आहे. १९५४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या शोमध्ये जमावाला नियंत्रित करणे पोलिसांना अशक्य झाले होते.

१९५२ मध्ये नर्गिस यांनी हॉलिवूडला भेट दिली तेव्हा ‘द टाइम्स-न्यूज’ने वृत्त दिले की, “जगातील सर्वोत्तम चित्रपट स्टार्सपैकी एक सुडौल श्यामला आहेत. त्यांना लाखो चाहते आहेत. त्या प्रत्येक चित्रपटासाठी १००,००० डॉलर कमावते. पण अमेरिकन लोकांनी तिचे नाव कधीच ऐकले नव्हते. भारताची नंबर १ फिल्म क्वीन नर्गिस आज भारतीय स्टार्स आणि निर्मात्यांच्या सदिच्छा प्रतिनिधी मंडळासह चित्रपटनगरीत आहे."

मिल्खा सिंग :

१९५० च्या दशकात भारतात हॉकी सर्वोच्च खेळ होता. क्रिकेट त्याच्या जवळपास होता. परंतु मिल्खा सिंग यांनी लोकांना ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांचा उत्सव साजरा करण्याचे कारण दिले आहे. १९५० च्या दशकात मिल्खा सिंग यांनी भारतात २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतींवर वर्चस्व गाजवले. त्यांनी राष्ट्रीय विक्रम बनवले.
 

आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये त्यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यांनी १९५६, १९६० आणि १९६४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण देशाने त्यांच्यासाठी सुवर्णपदकाची आशा बाळगली होती. ते तिथे प्रबळ दावेदार होते. जर ती सामान्य शर्यत असती, तर त्यांनी ती जिंकली असती. परंतु त्या दिवशी अनेक विक्रम मोडले गेले आणि ते चौथ्या स्थानावर राहिले. 

त्यावेळी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी एकाच दिवशी नव्हती. यापूर्वीच्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य आणि अंतिम फेरी एकाच दिवशी होत्या. अंतिम फेरी उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवशी झाली. अमेरिकेच्या ओटिस डेव्हिस आणि जर्मनीच्या कार्ल कौफमन यांनी ४४.९ सेकंदांचा जागतिक विक्रम केला. फोटो-फिनिशने दाखवले की डेव्हिस कौफमनपेक्षा १/१०० सेकंदाने पुढे होते.

दक्षिण आफ्रिकेचा माल स्पेन्स आणि मिल्खा यांनी अनुक्रमे ४५.५ आणि ४५.६ सेकंदात जवळजवळ बरोबरी केली. फ्लाइंग सिंगला ऑलिम्पिक सुवर्ण मिळाले नाही. परंतु मिल्खा यांनी भारताला साजरा करण्यासाठी नायक आणि खेळाडूंना अनुसरण्यासाठी आदर्श दिला आहे.  

राज कपूर :

के.ए. अब्बास यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहे की, “१९५४च्या शरद ऋतूत संपूर्ण सोव्हिएत युनियनमध्ये एक छोटी क्रांती झाली. ती एका तरुण भारतीयामुळे घडली. तो पाश्चात्य कपड्यांमध्ये विचित्र दिसत होता. दिसायला भटका, व्यवसायाने खिसेकापू, पण आनंदी, दयाळू आणि रोमँटिक व्यक्तिरेखा होती."

ते पुढे म्हणतात, "सर्व भटक्यांप्रमाणे तो ‘आवारा हूँ’ गात फिरत होता. हे विचित्र पात्र रातोरात देशात सर्वात लोकप्रिय व्यक्ती बनला. लोक त्यांना पाहण्यासाठी आणि त्याचं गाणं ऐकण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिले.   पण हा भटका केवळ सावली होता, चित्रपटातील एक पात्र.”  

ज्याने भारतीय आणि रशियन तरुणांना जोरदार धक्का देणारी राज कपूर एक लाट होती. ते केवळ मनोरंजन करणारे नव्हते. के.ए. अब्बास, शैलेंद्र, मुकेश, शंकर-जयकिशन यांच्या टीमसह राज कपूरने शिक्षित तरुणांमध्ये मूक समाजवादी क्रांती घडवली.

भारतातील नंतरच्या समाजवादी चळवळीचा पाया अनेकांनी घातला. त्यात राज कपूर निश्चितच एक होते. त्यांचे चित्रपट सामाजिक मुद्दे आणि वर्गीय मानवी संघर्ष प्रखर्षाने मांडत होते. १९५०च्या दशकात ते भारतातील शिक्षित तरुणांचे निर्विवाद आदर्श होते.  

दारा सिंग :

उत्तर भारताच्या हिंदी पट्ट्यात दारा सिंग हा कोणत्याही बलवान व्यक्तीसाठी सामान्य शब्द आहे. १९२८ ला पंजाबमध्ये जन्मलेल्या दारा सिंग यांनी १९५०च्या दशकाच्या सुरुवातीला व्यावसायिक कुस्तीच्या जगात तुफान आणले होते. त्यांनी बिल व्हर्ना, फिरपो झबिस्को, जॉन दा सिल्वा, रिकिडोझन, डॅनी लिंच, स्काय हाय ली आणि किंग काँग यांसारख्या प्रमुख कुस्तीपटूंना हरवले आहे.
 

१९५४ मध्ये त्यांना रुस्तम-ए-हिंद किताब मिळाला. त्यांच्या लोकप्रियतेत भर पडली ती त्यांच्या अॅक्शन अभिनेत्याच्या भूमिकांमुळे. व्यावसायिक कुस्तीत अपराजित राहिलेल्या आणि राष्ट्रकुल तसेच जागतिक अजिंक्यपद जिंकणाऱ्या कुस्तीपटूने तरुणांना तंदुरुस्ती आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची प्रेरणा दिली आहे.  

‘रेसलिंग रिव्ह्यू’ मध्ये मोहम्मद हनीफ यांनी लिहिले आहे की, “या नवीन युगात संपूर्ण भारतातील कुस्तीच्या मैदानांवर इतकेच किंवा कदाचित त्याहूनही जास्त चाहते आहेत. त्यांचा नवा आदर्श, लाखो लोकांचा नायक, प्रसिद्ध भारतीय चॅम्पियन दारा सिंग आहे… परंतु दारा सिंग भारतीय कुस्तीचा किंगपिन आहे. त्यांच्याशिवाय स्टेडियम शांत आणि रिकामे असतात."

ते पुढे म्हणतात, "त्यांचा धाकटा भाऊ रंधावा, ज्याच्याकडे स्टार ऑफ इंडिया अजिंक्यपद आहे, तो दारा यांच्यापेक्षा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघा भावांनी अलीकडेच इंग्लंडचा दौरा केला आणि सर्व विरोधकांना हरवले. त्यांनी पाकिस्तानच्या धाडसी भोल्लू पहेलवानाला आव्हान दिले. पण भोल्लूला दारा सिंगशी सामना नको आहे. तो आपला भाऊ अकरमला भारतीय विजेत्याशी लढण्यासाठी पुढे करतो. पण दारा सिंगला फक्त भोल्लू हवा आहे आणि कुस्तीच्या रिंगमध्ये एकट्या भोल्लूशीच सामना हवा आहे.”  

सत्यजित राय :

जर कोणी स्वतःला चित्रपटाचा विद्यार्थी म्हणत असेल आणि सत्यजित राय आणि त्यांच्या चित्रपटांचे अनुसरण केले नसेल तर शक्य आहे का? बंगालमधील तरुण सत्यजित राय यांनी, १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला फारच कमी पैशात आणि चित्रपट निर्मितीचा अनुभव नसताना चित्रपट बनवायला सुरुवात केली.
 

त्यांनी काही हौशी चित्रपटप्रेमींना सोबत घेऊन ‘पाथेर पांचाली’ चित्रपट बनवला. हा चित्रपट समान नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट योग्य पटकथेशिवाय आणि कमी पैशात दोन वर्षांहून अधिक काळात चित्रित झाला आहे. ३५ वर्षीय व्यक्तीने बनवलेला हा चित्रपट युरोपमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला गेला आहे.

या चित्रपटानंतर ‘अपराजितो’ आला, जो आणखी यशस्वी ठरला. सत्यजित राय यांच्या रूपाने तरुण इच्छुक चित्रपट निर्मात्यांना अनुसरण्यासाठी आदर्श मिळाला. रवींद्रनाथ टागोरांच्या निधनानंतर बंगालला रोल मॉडेल मिळाला. नव्या स्वतंत्र राष्ट्राला आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी मिळाला. यातून भारत कोणापेक्षा कमी नाही, हे सिद्ध झाले. सत्यजित राय यांचा भारतीय चित्रपट आणि संस्कृतीवरील प्रभाव निर्विवाद आहे.
 
- साकिब सलीम 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter