अल्पसंख्याक कल्याण विभाग आणि एस. के. पीपल्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर रोजी बेळगाव येथील अंजुमन हॉल येथे अल्पसंख्याक समाजासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी व शीख समाजातील वधू-वरांसाठी विवाहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कर्नाटक सरकारच्या सरल विवाह योजना अंतर्गत प्रत्येक पात्र जोडप्यास ५० हजार रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणींमुळे विवाह रखडलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सामूहिक विवाहात आपल्या मुला-मुलींचा किंवा स्वतःच्या विवाहासाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
एस. के. पीपल्स फाउंडेशन तसेच जवळच्या तालुका अल्पसंख्याक माहिती केंद्रात अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्यात आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र अर्जदारांनी वधू-वरांचे आधार कार्ड (सक्रिय मोबाईल नंबर संलग्न असणे आवश्यक), वधू-वरांच्या पालकांचे आधार कार्ड (वडील व आई), दोन साक्षीदारांचे आधार कार्ड, पालकांचे विधवा मृत्यू प्रमाणपत्र (असल्यास), जात व उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, बीपीएल शिधापत्रिका अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.