COMMERCIAL LPG: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १८३.५० रुपयांची कपात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर

 

नवी दिल्ली

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) सिलिंडरच्या दरात तब्बल १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या वर्षी झालेली ही पहिलीच दरवाढ नसून कपात आहे.

नवे दर आणि पार्श्वभूमी

तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता व्यावसायिक १९ किलोच्या सिलिंडरसाठी २,९३० रुपये मोजावे लागतील. गेल्या महिन्यात पश्चिम आशियातील संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या, परिणामी व्यावसायिक एलपीजीचे दर ३,११३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. जगभरातील ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे सलग अनेक वेळा वाढलेले दर यंदा प्रथमच कमी करण्यात आले आहेत.

व्यावसायिक एलपीजीचे दर हे दर महिन्याच्या १ तारखेला मागील महिन्यातील बेंचमार्क दरांवर आधारित सुधारले जातात. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर सध्या ९४२ रुपये असून, ७ जून रोजी त्यात २९ रुपयांची वाढ करण्यात आली होती.