US Indian Independence Day 2026: न्युयार्कच्या क्वीन्स परेडमध्ये भारतीय वंशाचे महापौर झोहरान मामदानींची विशेष उपस्थिती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 46 m ago
 भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू जर्सी येथे आयोजित कार्यक्रमात गिज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करताना भारतीय समुदाय व मानमान्य व्यक्ती.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू जर्सी येथे आयोजित कार्यक्रमात गिज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करताना भारतीय समुदाय व मानमान्य व्यक्ती.

 

न्युयॉर्क

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अमेरिकेतील न्युयार्क ट्राय-स्टेट परिसरात अतिशय उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. न्यू जर्सीमधील पार्सि Parsippany येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला. 'Largest Flagpole Number' (सर्वात मोठा ध्वजस्तंभ क्रमांक) या श्रेणीत हा विक्रम नोंदवला गेला आहे.

या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचा २५० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी १ हजार ३०० हून अधिक अमेरिकन ध्वज आणि भारतीय तिरंगी झेंडे एकत्र करून '250' हा आकडा साकारण्यात आला. न्युयार्क शहराचे भारतीय वंशाचे महापौर झोहरान मामदानी यांनी देखील क्वीन्स येथील इंडिया डे परेडमध्ये सहभाग घेतला. न्युयार्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास आणि फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (FIA) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक

न्युयार्कमधील ऐतिहासिक एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि नायगारा धबधबा यांसारख्या प्रमुख इमारती भारतीय तिरंग्याच्या रंगात उजळून निघाण्यात आल्या होत्या. या सोहळ्याला न्यू जर्सीचे लेफ्टनंट गव्हर्नर डेल काल्डवेल, भारताचे महावाणिज्यदूत बिनायक श्रीकांत प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यात भारतीय-अमेरिकन समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी वक्तांनी अधोरेखित केले.