यंदा रमझान महिन्याचा चंद्र गुरुवारी दिसला नसल्यामुळे संपूर्ण भारतात ईद-उल-फित्र शनिवार, दिनांक २१ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येणार आहे. पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातही ईद साजरी करण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. या पवित्र प्रसंगी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मस्जिदी तसेच ईदगाहांमध्ये सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत वेगवेगळ्या वेळेत ईदची नमाज अदा करण्यात येईल.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रमुख मस्जिदींचे नमाज वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसारच नमाज अदा केली जाणार आहे. ईदच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नागरिकांनी या बदलांना सहकार्य करून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या ईदचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम महिलांसाठी मस्जिदींमध्ये नमाजासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही सकारात्मक बदलाची दिशा मानली जात आहे. मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख यांनी देशभरात राबवलेल्या मोहिमेचा हा मोठा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. अनेक मस्जिदींनी महिलांसाठी ही स्वतंत्र सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. फरहा शेख यांनी सर्व संबंधित मशिदींचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
समाजात एकता, सौहार्द आणि समानतेचा संदेश देणारी ही ईद सर्वांनी शांततेत आणि आनंदात साजरी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. खालील वेळापत्रकानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येईल. नागरिकांनी कृपया दिलेल्या वेळेनुसार संबंधित मस्जिदीत उपस्थित राहावे.