बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एनआयए तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत तपास यंत्रणा लवकरच मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. एनआयएने दोन्ही आरोपींवर १०-१० लाख रुपयांची घोषणा केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयने या रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी अब्दुल मथीन ताहा आणि मुसाविर हुसैन शाजेब यांना कोलकातामधून अटक केली आहे. एनआयएने माहिती मिळाल्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळ्या आहेत.
मीडिया रिपोर्टानुसार, मुसाविर हुसैन शाजिबने कॅफेमध्ये आईईडी ठेवला होता. अब्दुलने याने या स्फोटाचा कट रचला होता. तसेच त्याने स्फोट करणे आणि घटनेनंतर पळून जाण्याची योजना आखली होती.
दोन्ही आरोपी त्यांची खरी ओळख लपवून कोलकात्यामध्ये लपले होते. एनआयएने या दोघांचा राहण्याचा पत्ता जाणून त्यांच्या मुसक्या आवळल्या. 'एनआयए'ला हे यश पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ पोलिसांच्या मदतीमुळे दोघांना अटक करण्यास यश आलं आहे.
रामेश्वरम कॅफेमध्ये काय घडलं होतं?
रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी आला होता. त्याने एक बॅग कॅफेतच ठेवली. त्यानंतर कॅफेतून बाहेर पडला. पुढे एका तासाने या कॅफेमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते. बेंगळुरीमधील हा प्रसिद्ध कॅफे आहे. या कॅफेतील बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली होती.