आजवर मुस्लिम बांधवांच्या वाट्याला केवळ आश्वासनेच - इद्रिस मुलतानी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
मालेगाव : येथील मिल्लत मदरसा येथे झालेल्या बूथ कमिटी संवाद बैठकीत बोलताना इद्रिस मुलतानी. शेजारी खासदार सुभाष भामरे आदी.
मालेगाव : येथील मिल्लत मदरसा येथे झालेल्या बूथ कमिटी संवाद बैठकीत बोलताना इद्रिस मुलतानी. शेजारी खासदार सुभाष भामरे आदी.

 

मुस्लिम समाजाला साठ वर्षांत काँग्रेस, व इतर पक्षांनी केवळ आश्वासनेच दिली. समाजाचा विकास न करत फक्त मते मिळवून स्वतःचा विकास केला. शहरात एमआयएम व काँग्रेस नेते घराणेशाही पद्धतीने आलटून पालटून सत्ता उपभोगत आहेत. येथील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्षित करत असल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ द्या असे आवाहन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी येथे केले.

येथील गोल्डन नगर भागातील मिलत मदरसा येथे झालेल्या धुळे, नंदुरबार लोकसभा बूथ कमिटी संवाद बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सुभाष भामरे, घनश्याम य विसपुते, अल्पसंख्याक महामंत्री एजाज शेख, अकबर शाह, झाकिर म पठाण, इब्राहिम शेख, तौसिफ म खाटीक, शैलेंद्र अचके, नितीन भोसले, सुरेखा भुसे आदी उपस्थित होते.

श्री. मुलतानी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांनी भाजपला साथ दिल्यास येथे रस्ते, गटार, शाळा, महाविद्यालय, दवाखाने आदी नागरी सुविधांसह पायाभूत कामे उत्तम दर्जाचे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. २०२४ हे विकासाचे वर्ष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करताना भेदभाव केला नाही. देशातील चार कोटी गरिबांना घरे दिली. यात मुस्लिम समाजातील असंख्य नागरिक असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.