'क्लासिक चेस'मध्ये आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 25 d ago
आर. प्रज्ञानंद
आर. प्रज्ञानंद

 

भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंदने 'क्लास‍िक चेस'मध्ये मॅग्नस कार्लसनचा प्रथमच पराभव केला आहे. भारताच्या या युवा खेळाडूने नॉर्वे चेस 2024 च्या तिसऱ्या फेरीत जगातील नंबर 1 खेळाडूचा पराभव केला. या विजयासह 18 वर्षीय भारतीय खेळाडू रमेशबाबू प्रज्ञानंदने कार्लसनच्या घरच्या मैदानावर झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे.

18 वर्षीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदने बुधवारी (29 मे) स्टॅव्हेंगर येथे नॉर्वे चेस 2024 स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनवर पहिला विजय नोंदवला. आर प्रज्ञानंदने नॉर्वे चेस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या शेवटी 9 पैकी 5.5 गुण मिळवले. दुसरीकडे, अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियो कारुआनाने बुधवारी जीएम डिंग लिरेनवर विजय मिळवून तीन गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले.

प्रज्ञानंदसाठी ही मोठी उपलब्धी आहे, गेल्या वर्षीच्या विश्वचषकात तो मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला होता. योगायोगाने, 'क्लास‍िक चेस'मध्ये कार्लसनला पराभूत करणारा प्रज्ञानंद हा केवळ चौथा भारतीय आहे.