वर्ल्डकपनंतर IND-PAK पुन्हा येणार आमने-सामने

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

एथियन क्रिकेट काऊंसिलने आगामी अंडर १९ एशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात येत्या ८ डिसेंबरपासून होणार आहे. ही स्पर्धा दुबईत खेळवली जाणार आहे. दरम्यान क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे.

गतविजेता भारतीय संघ नवव्यांदा जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. यापूर्वी झालेल्या अंडर १९ एशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर जोरदार विजय मिळवला होता. या स्पर्धेतील एका ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, नेपाल आणि अफगाणिस्तानचा संघ असणार आहे. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, युएई, श्रीलंका आणि जपानचा संघ असणार आहे.

 

एशियन क्रिकेट काऊंसिलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहीलं की,' शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ पासून दुबईत सुरु होणाऱ्या ACC U19 Mens Asia Cup स्पर्धेसाठी तयार राहा. हे युवा स्टार खेळाडू जेतेपद मिळवण्यासाठी आमने सामने येणार आहेत.' 


या दिवशी होणार भारत- पाकिस्तान लढत
या स्पर्धेत भारतीय अंडर १९ संघाचा पहिला सामना ८ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी उदय सहारनची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सौम्य कुमार पांडेकडे संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना भातर आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना आयसीसी अॅकडमी ओवल-१ च्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत- पाकिस्तान सामना येत्या १० डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना सकाळी ९:३० वाजता आयसीसी अॅकडमी ओवल-१ च्या मैदानावर खेळवला जाईल.

आगामी आयसीसी अंडर १९ एशिया कपसाठी असा आहे भारतीय संघ :
अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

स्टँडबाय खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.

राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.