युनियन सायकलिस्ट इंटरनेशनलचे (यूसीआय) आयुक्त आणि तांत्रिक संचालक जयालुद्दीन विन महमूद
'हिप हिप हुर्रे', 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष, 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हिंजवडी आयटीनगरीत पुणे ग्रँड टूर-२०२६ सायकल स्पर्धेचा उत्साह दिसत होता. जोशपूर्ण गाण्यांवर लहान-मोठ्यांनी धरलेला ठेका, ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर, रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि हातात तिरंगा घेऊन जल्लोष करणारी लहान मुले, या सर्वांच्या उपस्थितीत सायकल स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला.
परदेशी खेळाडू म्हणतात, 'कसं काय पुणे'
स्वाक्षरी करण्यासाठी मंचावर दाखल झालेल्या खेळाडूंनी उपस्थित पुणे-करांना उद्देशून मराठीमध्ये 'कसं काय पुणे ?' म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. नागरिकांचा उत्साह आम्हाला ऊर्जा देत अस ल्याचे या वेळी खेळाडूंनी सांगितले. खेळाडूंनीही नागरिकांसोबत फोटो काढत या प्रेमाला दाद दिली. स्पर्धा मार्गस्थ झाल्यानंतर ग्रामीण भागात रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेल्या नागरिकांनी ही स्पर्धकांना हात उंचावून, टाळ्या वाजवत प्रोत्साहन दिले. या वेळी नागरिकांनी नामवंत सायकलपटूंची तंदुरुस्ती, शिस्तबद्ध तयारी आणि धावत्या सायकलींचा वेगवान थरार अनुभवला.
मलेशिया, इंडोनेशियावर जबाबदारी
स्पर्धेचे स्वरूप कसे असावे, भार्ग कसा असावा, गुणांकन कसे असावे, स्पर्धेचे वेळापत्रक, सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था याबरोबरच स्पर्धेतील इतर तांशिक व प्रशासकीय जवाबदारीसाठी मलेशिया आणि इंडोनेशियातून ४३ तज्ज्ञ पुण्यात दाखल झाले. हे तज्ज्ञ विविध विभागात कार्यरत असून ते स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत असल्याचे स्पर्धेचे युनियन सायकलिस्ट इंटरनेशनलचे (यूसीआय) आयुक्त आणि तांत्रिक संचालक जयालुद्दीन विन महमूद यांनी सांगितले.
जमालुद्दीन हे नाव आशियाई आणि जागतिक सायकलिंग क्षेत्रातील नामवंत नाव आहे. मूळ मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील जमालुद्दीन यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायव सायकल स्पर्धेत भाग घेत विविध पारितोषिके पटकावली आहेत. जमालुसैन है आता 'यूसीआय'मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी जगभरात एक हजारहून अधिक सायकल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पाच दांडग्या अनुभवामुळे त्यांना पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या संचालकपदी नेमले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कित्येक लोक रात्रंदिवस मेहनात घेत आहेत. माझ्या सहकाऱ्यांमध्ये माजी सायकलपटूट्टी आहेत. तसेच, सर्वांना जगभरात स्पर्धा आयोजित करण्याचा किमान वौसहून अधिक वर्षांचा अनुभस असल्याने ही स्पधदिखील आम्ही उत्तमरीत्या आयोजित करू असा मला विश्वास आहे."
भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या स्पर्धेबद्दल ते म्हणाले, "सायकलिंगसाठी भारत आणि विशेषतः पुणे स्पर्धेसाठी उगवता केंद्र बनू शकतो. हे शहर, येथील लोक, संस्कृती आणि सर्वांत महत्वाच म्हणजे स्पर्धेबद्दलचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे." स्पर्धेच्या आयोजनाबद्दल ते म्हणाले, "स्पर्धेसाठी तयार केलेल्या मार्गाची पाहणी आम्ही केली. संपूर्ण ४३७ किलोमीटरचा मार्ग हा उत्कृष्ट झाला आहे. रस्त्यांची गुणवत्ता जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल अशी आहे."