राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत पुणे वॉरियर्स विजयी

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेतील विजेते खेळाडू
राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेतील विजेते खेळाडू

 

पुणे वॉरियर्सने दोन दिवसीय सामायिक नॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्ध्येत तीन विजेतेपद मिळवले. ७ आणि ८ जानेवारीला येरवडा, पुणे येथील डिवीजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. संजय सावंत बास्केटबॉल अकॅडमी आणि ग्लोबल स्पोर्ट्स मॉनिटरिंगच्या मदतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


या कार्यक्रमाचे नेतृत्व माजी विद्यार्थी मोहम्मद शम्स, आलम शेख आणि जावेद चौधरी यांनी केले. स्पर्ध्येमध्ये पुणे वॉरियर्स, पुणे सिंघम, पुणे फाल्कन, जी ९ हैद्राबाद, विदर्भ वॉरियर्स, बंगळूर कॅपिटल, हंगर हंटर बेळगावी टायगर यांनी सहभाग घेतला होता. 


या स्पर्ध्येमध्ये पुणे वॉरियर्स संघाने विजेतेपद मिळवले आहे. या संघाचे कर्णधार जावेद चौधरी होते. प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघाला २०,००० रुपये रोख रक्कम, अँथनी परेरा ट्रॉफी, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. 


या स्पर्ध्येत दुसरा क्रमांक हैद्राबाद जी ९ या संघाचा आला. त्यांच्या संघाचे कर्णधारपद कोटेश्वर राठोड यांनी बजावले. हैद्राबाद जी ९ संघाला पुरस्कार म्हणून १५००० रुपये रोख रक्कम, स्वर्गवासी गोविंद भोसले स्मृती ट्रॉफी, रौप्य पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. 


तिसरे स्थान मिळवलेल्या बंगळूर कॅपिटल संघाला १०००० रुपये रोख रक्कम, जवान रवींद्र चव्हाण स्मारक ट्रॉफी, कांस्य पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्ध्येत सर्वात चांगलय  खेळाडूचा पुरस्कार कौटेश्वर राठोड यांना देण्यात आला. 


सर्वश्रेष्ठ महिला खेळाडूचा पुरस्कार बंगळूर संघाच्या आरतीला देण्यात आला. उदघाटन कार्यक्रमाला विद्या म्हात्रे, एडीजी सीमा रामानंद, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू संभाजी कदम आणि छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद शेठ शिव हे उपस्थित होते. 


स्पर्ध्येच्या तांत्रिक समितीमध्ये शरद नागाने (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक), संजय सावंत (एसएसबीए, प्रशिक्षक), ओमप्रकाश (प्रशिक्षक, एसएसबीए) यांचा समावेश करण्यात आला होता. पंचांची भूमिका बी. एस. लक्ष्य, आशिष शिंदे, संतोष भोसले, नितीन जावडे आणि एमएस हरमिंदर कौर यांनी निभावली. 


स्पर्ध्येच्या निरोप कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून डॉ. नवीन गौतम (व्यवस्थापकीय संचालक हेला इंडिया ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गजानंद वायल (नट आणि फ्लेक्स), महादेव कासगवाडे (जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे महाराष्ट्र), राजू चव्हाण (समृद्धी हॉटेल), मंगेश गोळे हे उपस्थित होते. 


या कार्यक्रमाच्या वेळेला असे सांगण्यात आले की, विजेत्या संघाला देण्यात येणारी ट्रॉफी प्रिय प्रशिक्षक दिवंगत अँथनी परेरा यांना समर्पित करण्यात आली आहे. अँथनी परेरा हे  आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलीट आणि भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. 


आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपट्टू शम्स आलम यांच्या मते, अँथनी परेरा पॅरा स्पोर्ट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाच्या चांगल्यासाठी नेहमीच सक्रिय असतात. २०२२ मध्ये मुंबईत व्हीलचेअर बास्केटबॉलच्या प्रशिक्षण सामन्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चॅम्पियनशिपच्या यशस्वी आयोजनामध्ये सक्षम चॅरिटेबल ट्रस्ट, इव्हेंट निन्जा, नट आणि फ्लेक्स, समृद्धी हॉटेल, भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.