सादमोहम्मद पटेल : गोदावरीच्या लहरींवर स्वप्नांचा प्रवास करणारा जलक्रीडापटू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
सादमोहम्मद जाहिरअली पटेल
सादमोहम्मद जाहिरअली पटेल

 

अरुण मलाणी

गोदावरी नदीच्या लहरींवर सराव करताना सादमोहम्मद जाहिरअली पटेल जलक्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करतोय. अकरावीपासून या क्रीडा प्रकारात सहभागी होताना त्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत पदकांची लयलूट केली आहे. शासनाकडून आणखी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास आशियाई स्पर्धेत निश्चित पदकांची कमाई करणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. 

मूळचा आहेरगाव (ता. निफाड) येथील सादमोहम्मद हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. इतर मुलांप्रमाणे त्याचेही शालेय जीवन खेळत-बागडत पूर्ण झाले. महाविद्यालयीन जीवन त्याच्या संपूर्ण करिअरला कलाटणी देणारे ठरले. इयत्ता अकरावीत प्रा. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाशी संलग्न बोट क्लबशी जोडला गेला. गेल्या सात वर्षांपासून खेळताना त्याने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

उदयोन्मुख खेळाडू
ळचा आहेरगाव (ता. निफाड) येथील सादमोहम्मद हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. इतर मुलांप्रमाणे त्याचेही शालेय जीवन खेळत-बागडत पूर्ण झाले. महाविद्यालयीन जीवन त्याच्या संपूर्ण करिअरला कलाटणी देणारे ठरले. इयत्ता अकरावीत प्रा. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाशी संलग्न बोट क्लबशी जोडला गेला. गेल्या सात वर्षांपासून खेळताना त्याने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

आतापर्यंत सादमोहम्मदने चार ऑल इंडिया स्पर्धा, सहा राष्ट्रीय स्पर्धा, एक खेलो इंडिया आणि सहा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. यापैकी चंडीगड येथे झालेल्या २०२१-२२ च्या ऑल इंडिया स्पर्धेत ५०० मीटर गटातून सुवर्णपदक जिंकले. २०२३-२४ मध्ये चंडीगडलाच झालेल्या स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले. राष्ट्रीय स्पर्धेत त्याचे पदक थोडक्यात हुकल्याने त्याच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागानंतर सादमोहम्मदला स्पर्धांचे महत्त्व लक्षात आले. भरपूर तास सराव करून जे शिकायला मिळते, तोच धडा एका स्पर्धेतून मिळतो. म्हणून जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभागाचा त्याचा प्रयत्न राहिला आहे.

खडतर प्रवासातून यशस्वी
सादमोहम्मद सध्या सिंगल स्कल, डबल स्कल, फोर स्कल आणि मिक्स अशा चार गटांतून स्पर्धा खेळत असतो. त्याच्या कामगिरीच्या आधारे २०२२-२३ मध्ये त्याला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यापीठीय स्पर्धेत त्याने एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले. स्पर्धामध्ये सहभागासाठी व एरवी वर्षभर त्याचा खडतर प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात सकाळच्या वेळी शेतीत काम करून त्यानंतर तो सरावाला जात असे. दोन्हींमध्ये समन्वय साधताना त्याची चांगलीच तारेवरची कसरत व्हायची. सध्या तो पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, विविध स्पर्धामध्ये सहभागी होत असतो.

सरावासाठी जास्तीत जास्त वेळ
पहाटे पाचलाच सादमोहम्मदच्या दिवसाला सुरुवात होते. व्यायामानंतर सकाळी सात ते अकरादरम्यान तो सराव करतो. घरी परतल्यावर कौटुंबिक कामे, जबाबदाऱ्या पार पाडतो. यानंतर दुपारी चारला पुन्हा सरावासाठी जातो. सायंकाळी सहा ते रात्री आठदरम्यान व्यायामावर भर देतो. असा दिनक्रम ठेवत त्याने सरावावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

बोट अद्ययावत करण्याची गरज...
खेळात खेळाडूच्या कष्टाबरोबर त्याच्या उपकरणांनाही तितकेच महत्त्व असते महाराष्ट्रातील खेळाडू सध्या विविध स्पर्धांमध्ये सनी किंवा कार्गो बोटचा वापर करतात. मात्र, इतर विविध राज्यांचे बहुतांश खेळाडू नेलो बोट वापरतात. ही आधुनिक बोट असून, राज्यानेही बोट अद्ययावत केल्यास पदक विजेत्या खेळाडूंची संख्या वाढेल, असा विश्वास सादमोहम्मदने व्यक्त केला आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter