नेतान्याहू यांना रोखण्याचे इस्राईलच्या माजी पंतप्रधानांनी केले आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 12 d ago
अमेरिका आणि जर्मनीने दिला सबुरीचा सल्ला
अमेरिका आणि जर्मनीने दिला सबुरीचा सल्ला

 

जनतेचा तीव्र विरोध असतानाही देशातील न्यायपालिकांचे अधिकार कमी करण्यासाठी संसदेत विधेयक मांडणारे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना रोखण्याचे आवाहन देशाचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांनी जागतिक नेत्यांना केले आहे. अमेरिका आणि जर्मनी या इस्राईलच्या अत्यंत जवळच्या मित्रदेशांनीही नेतान्याहू यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

 

 

 
न्यायपालिकांतील या प्रस्तावित बदलाविरोधात देशातील जनता गेल्या काही आठवड्यांपासून आंदोलन करत असून विधेयक संसदेत सादर झाल्यापासून त्यांनी हे आंदोलन तीव्र केले आहे. आता, २००६ ते २००९ या काळात पंतप्रधानपद सांभाळलेले एहुद ओल्मर्ट यांनी नेतान्याहूंना विरोध केला आहे. जागतिक नेत्यांनी नेतान्याहू यांना रोखावे, त्यांना भेटण्यास नकार द्यावा, असे जाहीर आवाहन ओल्मर्ट यांनी केले आहे. विशेषत: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांनी ही विनंती केली आहे. येत्या काही दिवसांत सुनक यांच्या निमंत्रणावरून नेतान्याहू ब्रिटनला जाणार आहेत. सध्याचे सरकार देशविरोधी असल्याची टीकाही ओल्मर्ट यांनी केली.