NEPAL FLOODS: २.५६ अब्ज डॉलर्सच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज; पुनर्रचना आणि मदतीसाठी प्रशासनाकडून पावले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
पुरामुळे २० हजार घरे पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत, हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता
पुरामुळे २० हजार घरे पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत, हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता

 

काठमांडू

गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरामुळे देशाचे सुमारे ३८७.५ अब्ज नेपाळी रुपये म्हणजेच २.५६ अब्ज डॉलर्स इतके प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख धर्म राज उप्रेती यांनी रॉयटर्सशी बोलताना ही माहिती दिली.पुराच्या तडाख्यामुळे रस्ते, घरे आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

पुढील चार महिन्यांच्या प्राथमिक पुनरुत्थान काळात रस्ते आणि तात्पुरते निवारे उभारणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे ५ कोटी २६ लाख डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे.विविध संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने ही प्राथमिक आकडेवारी काढण्यात आली असून लवकरच सविस्तर मूल्यांकन केले जाणार असल्याचे उप्रेती यांनी स्पष्ट केले.

२० हजार घरांच्या पुनर्रचना आणि विनाशाची व्याप्ती

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागांत सुमारे २० हजार घरांची पुनर्बांधणी करावी लागणार असून त्यापैकी किमान ७,५०० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.गेल्या २६ ऑगस्ट रोजी नेपाळ आणि चीन सीमेवरील हिमवर्षेमुळे त्रिशूल नदीत आलेल्या महाप्रलयामुळे अनेक गावेच्या गावे नष्ट झाली असून जीवितहानीचा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.



Latest News