वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (२७ नोव्हेंबर २०२५) व्हाईट हाऊसच्या काही अंतरावर दोन नॅशनल गार्ड जवानांवर झालेल्या गोळीबाराचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या घटनेला दहशतवादी कृत्य असे संबोधले असून, हल्लेखोर हा अफगाणिस्तानमधून आलेला निर्वासित असल्याचे म्हटले आहे.
या घटनेनंतर ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाला कठोर निर्देश दिले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेत आलेल्या प्रत्येक अफगाण निर्वासिताची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
"हा घृणास्पद हल्ला एक दृष्ट कृत्य, द्वेषाचे कृत्य आणि दहशतीचे कृत्य होते," असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी शपथ घेतली की, त्यांचे प्रशासन "माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानमधून आपल्या देशात प्रवेश केलेल्या प्रत्येक परदेशी नागरिकाची पुन्हा तपासणी करेल."
ट्रम्प यांनी सांगितले की, दोन नॅशनल गार्ड जवानांवर गोळीबार करणारा संशयित हा एक अफगाण नागरिक आहे, जो तालिबानपासून वाचून पळून आला होता.
कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी संशयिताची ओळख रहमानुल्ला लखनवाल अशी पटवली आहे. तो वॉशिंग्टन राज्यात राहत होता. मात्र, अधिकारी अजूनही त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे पडताळून पाहण्याचे काम करत आहेत, अशी माहिती दोन कायदा अंमलबजावणी अधिकारी आणि या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने दिली. चालू तपासाचे तपशील उघड करण्यास मनाई असल्याने त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'द असोसिएटेड प्रेस'ला ही माहिती दिली.