इस्लामिक स्टेट (IS) कडून सैन्य प्रशिक्षण घेतल्याची कबुली देणाऱ्या अमेरिकन नागरिक लिरिम सायलेजमानी याला सोमवारी २ जून २०२५ रोजी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. वॉशिंग्टन डीसी येथील अमेरिकन जिल्हा न्यायाधीश रुडॉल्फ कॉन्ट्रेरास यांनी ही शिक्षा सुनावली. त्यानंतर सायलेजमानीवर आयुष्यभर देखरेख ठेवली जाईल.
४९ वर्षीय सायलेजमानी मूळचा कोसोव्होचा आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी तो शिकागोत स्थायिक झाला. गेल्या डिसेंबरमध्ये त्याने परदेशी दहशतवादी संघटनेकडून सैन्य प्रशिक्षण घेतल्याचा एक गुन्हा कबूल केला. अभियोजकांनी सांगितलं की, २०१५ मध्ये सायलेजमानी सिरियात गेला आणि तिथे त्याने अमेरिका-नेतृत्वाखालील सैन्याविरुद्ध किमान एका लढाईत भाग घेतला.
नोव्हेंबर २०१५ मध्ये सायलेजमानी कुटुंबासह तुर्कस्तानमार्गे सिरियात पोहोचला. तिथे त्याने IS च्या इतर नव्या सदस्यांसह प्रशिक्षण सुरू केलं. जून २०१६ मध्ये सिरियन सैन्याशी लढाईत तो जखमी झाला. फेब्रुवारी २०१९ मध्ये बाघूझ, सिरियात त्याला कुटुंबासह पकडलं गेलं.
“ही एकच आवेगपूर्ण कृती नाही. त्याने कुटुंबाचं सुरक्षिततेचं जोखीम पत्करून त्यांना युद्धग्रस्त देशात नेलं आणि IS साठी शस्त्र उचललं,” असं अभियोजकांनी कोर्टात सांगितलं. सायलेजमानीच्या वकिलांनी मात्र तो कट्टर जिहादी नसल्याचं म्हटलं. “तो हिंसाचाराचा पुरस्कार करत नाही. आपल्या कृतींमुळे कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल त्याला पश्चात्ताप आहे. त्याचं कुटुंब सिरियातील निर्वासित छावणीत कठीण परिस्थितीत आहे,” असं वकिलांनी लिहिलं. सायलेजमानीच्या वकिलांनी सांगितलं की, तो आपली शिक्षा पूर्ण करून कुटुंबाला पुन्हा भेटू इच्छितो आणि सामान्य, कायदेशीर आयुष्य जगू इच्छितो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter