व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे मानले आभार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेन संघर्षावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि इतर देशाच्या प्रमुखांचे आभार मानले आहेत.

काल रशियाच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या 30 दिवसांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुतीन यांनी म्हटले, “सर्वप्रथम, मी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो त्यांनी रशिया आणि यूक्रेनच्या शांततेसाठी खूप लक्ष दिले. हे युद्ध थांबणे गरजेचे होते. यामुळे मानवजातीची हानी होत होती. अनेक देशांच्या प्रमुखांनी, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, ब्राझीलचे अध्यक्ष आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी खूप वेळ दिला. त्यासाठी त्यांचे आभार.” 

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात व्हाइट हाऊस मध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सांगितले होते की, भारत युध्दाच्या बाबतीत तटस्थ नाही. भारत शांततेसाठी काम करत आहे. त्यापूर्वी मोदी यांनी पुतीन यांना सांगितले की हे युद्धाचे युग नाही. हे संवाद आणि कूटनीतीचे युग आहे. रशिया  यूक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून, पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी अनेक वेळा संवाद साधला आहे.

युनायटेड स्टेट्सने रशियावर युद्धविरामाच्या प्रस्तावावर शर्ती न ठेवता सहमती दर्शवण्याचा आग्रह केला आहे. पुतीन यांनी सांगितले की, रशिया युद्धविरामाचा प्रस्ताव मंजूर करत आहेत. परंतु यामध्ये काही बारीक मुद्दे आहेत. त्यावर कसे काम केले जाईल हा गंभीर प्रश्न आहे.

ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, पुतीन यांनी मंजूर केलेला प्रस्ताव आशादायक आहे. परंतु टो प्रस्ताव त्यांनी पूर्णपणे मंजूर केला नाही.
   
यूक्रेनने सौदी अरेबियामध्ये झालेल्या चर्चेत 30 दिवसांच्या युद्धविरामासाठी अमेरिकेच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली. रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये यूक्रेनवर पूर्णपणे आक्रमण केले होते. यामुळे शंभर हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आणि जखमी झाले. लाखो लोकांचे जीवन विस्थापित झाले असून शहर उद्ध्वस्त झाली आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter