आवाज द व्हॉइसची ‘चेंजमेकर्स’ मालिका आता बिहारमधील सामाजिक क्षेत्रातील दहा व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा घेऊन येत आहे. या केवळ कथा नाहीत, तर गावपातळीवरील बदलाची खरी उदाहरणे आहेत. या कथेतील नायक वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. काही समाजकार्यात रमले, काही शिक्षण क्षेत्र बदलताहेत, तर काही जीवनाच्या विविध पैलूंमध्ये ठसा उमटवत आहेत.
या नायकांमध्ये कर्तुत्ववान महिला देखील आहेत. त्यांच्या कामाने समाजाला दिशा दिली आहे. त्या स्वतः रोल मॉडेल बनल्या आहेत. धैर्य, समर्पण, कष्ट आणि मर्यादित साधनांचा वापर करून त्या ठोस बदल घडवत आहेत. या यादीत शिक्षक, उद्योजक, समाजसेवक यांचा समावेश आहे. त्यांच्या कथा अभिमानास्पद आणि समाजाला दिशा दाखवणार्ऱ्या आहेत.
खुर्शीद अहमद
खुर्शीद अहमद यांनी बिहारच्या सांस्कृतिक सांस्कृतिक वारशाला पुन्हा जीवनदान देत आहे. त्यांनी पाटणाला साहित्य आणि कलेसाठी जीवंत केंद्र बनवले. कव्वाली, कविता, साहित्य आणि सूफी संगीत या पारंपरिक कला पुन्हा लोकजीवनात आणल्या. या अभिव्यक्तींना नवीन ऊर्जा आणि आधुनिक महत्त्व दिले.
जाबिर अन्सारी
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जीवन बदलू शकते याचे उदाहरण आहे जबिर अन्सारी. जबिर अन्सारी यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे समर्पण त्यांना आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट क्षेत्रात घेऊन गेले. जमुई जिल्ह्यातील नक्षल प्रभावित झांझा ब्लॉकच्या तुम्बा पहाड गावातील जबिर यांनी अनेक सुवर्णपदके जिंकली आणि भारताला गौरव मिळवून दिला.
शम्स आलम
एक काळ होता जेव्हा, शम्स आलम यांच्या पाठीत ट्यूमर आढळला. तरीही डॉक्टरांनी सांगितले की काही आठवड्यांत ते पुन्हा धावू शकतील. परंतु ती वेळ कधीच आली नाही. अर्धांगवायूने त्यांच्या शरीराचा खालचा भाग सुन्न झाला. हा जीवन बदलणारा प्रसंग होता. निराशेला न जुमानता शम्स यांनी ठामपणा दाखवला. पोहण्यावरील प्रेमाने ते याच क्षेत्रात पुढे गेले. बिहार, भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विक्रम केले आहेत.
तैय्यबा अफरोझ
तैय्यबा अफरोझ हवाई दलातील वैमानिक आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर 'बॉर्न टू फ्लाय' आणि 'ड्रीम, अॅचिव्ह, फ्लाय' असे लिहिलेले आहे. या प्रेरणादायी शब्दांमागे शक्तिशाली कथा आहे. त्यांनी पूर्वजांची जमीन विकली, सामाजिक टीकेला तोंड दिले. शारीरिक आणि भावनिक अडचणींवर मात केली. सारण जिल्ह्यातील जलालपूर गावातील तैय्यबा अफरोझ राज्यातील पहिल्या मुस्लिम महिला व्यावसायिक वैमानिक आहेत. त्या संघर्ष, चिकाटी आणि मोठ्या स्वप्नांचे प्रतीक आहेत.
डॉ. एम. ऐजाज अली
राज्यसभेचे माजी खासदार डॉ. एम. ऐजाज अली जवळपास तीस वर्षे उपेक्षितांसाठी झुंजत आहेत. त्यांचा विश्वास आहे की खरी प्रगती सामाजिक समानता आणि गरीबांचे हक्क जपल्याशिवाय अपूर्ण राहते. १९५८ मध्ये जन्मलेले आणि अनाथाश्रमात वाढलेले डॉ. अली यांनी गरिबीवर मात करून पाटणा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
जमील अख्तर
एनटीपीसीचे उपमहाव्यवस्थापक जमील अख्तर यांनी बिहारमधील गरजू मुलांना शिक्षण देण्यास आयुष्य वाहिले. त्यांचे समर्पण इतके तीव्र आहे की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाले तर ५५० मुलांचे शिक्षण आणि काळजी घेणे कठीण होईल, असे त्यांनी आवाज द व्हॉइसला सांगितले. पुढच्या पिढीला चांगले शिक्षण देणे हा त्यांचा हेतू आहे.
मोहम्मद इब्राहिम
मोतिहारीच्या रामना गावातील मोहम्मद इब्राहिम यांचा असामान्य प्रवास बिहारच्या तरुणांनाच नाही, तर संपूर्ण भारताला प्रेरणा देतो. मोतिहारी ते दुबईचा त्यांचा प्रवास ठामपणाचा पुरावा आहे. नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना बेस्ट ट्रॅव्हल अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या व्यावसायिक प्रवासात हा महत्त्वाचा टप्पा आहे.
डॉ. मुमताज नैयर
डॉ. मुमताज नैयर यांचा जन्म बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील छोट्या गावात झाला. लहानपणी त्यांच्या कुटुंबाला मूलभूत गरजा पूर्ण करणेही कठीण होते. अडचणींमध्येही कुटुंबाने त्यांना शिक्षण दिले. हा निर्णय नंतर जगातील प्राणघातक विषाणूंविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा ठरला.
फैजान अली
फैजान अली यांनी वयाच्या १८व्या वर्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केला. जीवनाने त्यांना सखोल उद्देशाकडे नेले. अभ्यास किंवा महत्वाकांक्षा पेक्षा मानवसेवा हा त्यांचा खरा हेतू ठरला. “एखाद्याच्या वेदना जाणून घ्यायच्या असतील तर वय आणि शिक्षण महत्त्वाचे नाही, कार्य महत्त्वाचे आहे,” असे फैजान यांनी आवाज द व्हॉइसला सांगितले. आता २३ वर्षांचे फैजान गयातील एक नम्र समाजसेवक आहेत. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या फैजान यांनी स्वतःचे कॉर्पोरेट भविष्य सोडले आणि समाजकार्याकडे वळाले.
रानी खानम
रानी खानम स्वतंत्र भारतातील पहिल्या मुस्लिम कथक नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकचे व्यवसायात रूपांतरित केले. बिहारच्या गोपालगंज येथील संगीत आणि नृत्याला परवानगी नसलेल्या कुटुंबात लपून कथक शिकल्या. त्यांच्या कलेने महिलांना सशक्त केले. तसेच महत्त्वाच्या सामाजिक मुद्यांना उजेडात आणले.