हिंगोली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्षात हत्येचा शिकार ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) स्वयंसेवक शेख अब्दुल हाफिज याचा मुलगा हा खरा देशभक्त आणि देशाचा हिरो आहे, अशा शब्दांत सीजेपीचे नेते अभिजित दिपके यांनी त्याचे कौतुक केले आहे. हिंगोली जिल्ह्यात 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत एका शाळेला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हांगासा उच्चार केला.
अब्दुल हाफिज याने NEET पेपर लीक घोटाळ्याविरोधात जंतरमंतर येथील आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमधील आपल्या गावी जाऊन त्याने स्थानिक शाळेची पाहणी केली होती. यादरम्यान झालेल्या हल्ल्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. अब्दुलसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना आपण भावूक झाल्याचे सांगत, तो आजही आपल्या संघर्षावर ठाम असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.
अब्दुलने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गावात एक आदराची शाळा सुरू करण्याची मागणी केली असून, अशा कठीण प्रसंगीही देशाचा विचार करणाऱ्या अब्दुलसारखा तरुण हाच खरा देशभक्त असल्याचे दिपके म्हणाले. दरम्यान, सीजेपी नेत्यांनी पश्चिम बंगाल सरकारकडे या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.