सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर NCERT चा मोठा निर्णय! अभ्यासक्रम सुधारणेला मिळणार वेग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) संस्थेने आपल्या पाठ्यपुस्तक समितीची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात शालेय पाठ्यपुस्तकांमधील त्रुटींवरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहेत.

न्यायालयाने पाठ्यपुस्तकांमधील जुनी माहिती आणि तथ्यांमधील चुकांबद्दल केंद्र सरकारला जाब विचारला होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. या पार्श्वभूमीवर जुनी समिती बरखास्त करून नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन समितीमध्ये विविध राज्यांतील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या पुस्तकांचे पुनरावलोकन करेल. अभ्यासक्रमात आधुनिक काळाशी सुसंगत बदल करणे आणि माहितीची अचूकता तपासणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असेल. बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापर्यंत नवीन आणि सुधारित पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.