'आम्ही एकत्र शूटिंग केले, तो माझ्या डोळ्यांसमोर मन्नतचा मालक बनला'; शाहरुख खानबद्दल काय म्हणाले अनिल कपूर?

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली:


ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी नुकतीच एका जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानसोबतच्या आपल्या मैत्रीबद्दल आणि शाहरुखच्या बहुचर्चित 'मन्नत' बंगल्याशी असलेल्या जुन्या संबंधांबद्दल एक रंजक किस्सा सांगितला आहे. अनिल कपूर सध्या स्टार प्लसवरील 'इंडिया के टॉप १%' (India Ke Top 1%) या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत. या शोच्या एका एपिसोडदरम्यान जेव्हा एका स्पर्धकाने तिला १ कोटी रुपये जिंकल्यास शाहरुख खानसारखा 'मन्नत'सारखा बंगला विकत घ्यायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली, तेव्हा अनिल कपूर यांनी या वास्तूशी आणि शाहरुखशी जोडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शाहरुख खानच्या डोळ्यात दिसली होती स्टार बननेची चमक

शाहरुख खानबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले की, शाहरुखसोबत त्यांची अनेक वर्षांपासून खूप घट्ट आणि जवळची मैत्री आहे. जेव्हा ते १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बेनाम बादशाह' चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा शाहरुख त्यांना भेटायला आला होता. त्याला पाहिल्यावर आणि त्याच्या डोळ्यात बघूनच आपल्याला तो भविष्यात एक खूप मोठा स्टार बनणार असल्याचा अंदाज आला होता, असे अनिल कपूर यांनी नमूद केले. तिथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि काळाबरोबर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली, असे त्यांनी सांगितले.

'मन्नत'मध्ये केले होते 'तेजाब'चे शूटिंग

शाहरुख खानचे मन्नत विकत घेण्याचे स्वप्न कसे पूर्ण झाले, याची आठवण सांगताना अनिल कपूर म्हणाले की, आम्ही पूर्वी कार्टर रोडवर भेटायचो, जिथे त्याचे एक फ्लॅट होते. त्यालाही एक भव्य, समुद्रकिनाऱ्यावरील (sea-facing) बंगला असावा असे स्वप्न होते आणि त्याने ते स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखवले. अनिल कपूर यांनी सांगितले की, शाहरुखने आपल्या डोळ्यांसमोर 'मन्नत' हा बंगला विकत घेतला. विशेष म्हणजे, हा बंगला शाहरुखचे घर बनण्यापूर्वी तिथे अनिल कपूर यांनी त्यांच्या 'तेजाब' या सुपरहिट चित्रपटाचे शूटिंगही केले होते. अनिल कपूर आणि शाहरुख खान यांनी १९९५ मध्ये आलेल्या 'त्रिमूर्ती' या चित्रपटात एकत्र काम केले होते.



Latest News