प्रसिद्ध रॅपर बादशहा आणि अभिनेत्री इशा रिकही यांचा घटस्फोट; लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत घेतला विभक्त होण्याचा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
प्रसिद्ध रॅपर बादशहा आणि अभिनेत्री इशा रिकही यांच्या घटस्फोटाच्या घोषणेची पोस्ट
प्रसिद्ध रॅपर बादशहा आणि अभिनेत्री इशा रिकही यांच्या घटस्फोटाच्या घोषणेची पोस्ट

 

नवी दिल्ली 

प्रसिद्ध रॅपर बादशहा (Badshah) आणि पंजाबी अभिनेत्री इशा रिकही (Isha Rikhi) यांनी लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांतच घटस्फोट जाहीर केला आहे. या दोघांनी २०२१ मध्ये डेटिंग करायला सुरुवात केली होती आणि याच वर्षाच्या सुरुवातीला एका खाजगी सोहळ्यात त्यांनी लग्नगाठ बांधली होती. सोमवारी दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर संयुक्त स्टेटमेंट शेअर करत हा निर्णय परस्परसंमतीने घेतल्याचे जाहीर केले आहे.

दोघांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही परस्परसंमतीने वेगळे होण्याचा आणि आपल्या स्वतंत्र मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आदरपूर्वक घेण्यात आला असून आम्ही सर्वांना आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे विनम्र आवाहन करतो. या प्रकरणावर आमचे हेच अंतिम स्टेटमेंट असेल आणि आमच्या नात्याबद्दल यापुढे कोणतेही तर्कवितर्क किंवा अंदाज लावले जाऊ नयेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

बादशहाचे पहिले लग्न आणि वैयक्तिक आयुष्य

यापूर्वी रॅपर बादशहाचे लग्न जॅस्मीन मसीह यांच्याशी २०१२ मध्ये झाले होते. मात्र, २०२० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यांना जेसेमी ग्र्रेस मसीह सिंग ही २०१७ मध्ये झालेली एक मुलगी आहे. आता इशा रिकहीसोबतच्या विवाहाच्या अवघ्या पाच महिन्यांनंतर आलेल्या या बातमीने संगीत आणि मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.