सलिम कुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; सुपरस्टार मम्मूटी यांनी वाहिली श्रद्धांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
अभिनेते मम्मूटी आणि सलिम कुमार
अभिनेते मम्मूटी आणि सलिम कुमार

 

मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सलिम कुमार यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. सुपरस्टार मम्मूटी यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत एका भावूक पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी न्यूमोनियावरील उपचारादरम्यान शनिवारी कोची येथील एका खाजगी रुग्णालयात सलिम कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.

'तू आता फक्त मला रडवत आहेस'

मम्मूटी यांनी रविवारी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिवंगत अभिनेत्याचा फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, "सलिम, ज्याने हसवले आणि इतरांनाही हसवायला शिकवले, ज्याने विचार केला आणि इतरांनाही विचार करायला लावला, आणि जो कधीकधी स्वतः रडला आणि त्याने इतरांनाही रडवले— आता, तू फक्त मला रडवत आहेस... तुझा हा निरोप म्हणजे कधीही न संपणारे दुःख बनले आहे."

अष्टपैलू अभिनयाचा प्रवास

सलिम कुमार यांनी १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सिनेसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी मिमिक्री आणि कॉमेडीच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली होती. १९९७ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी, २००० च्या दशकात त्यांच्या विनोदी भूमिकांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी कॉमेडीसोबतच गंभीर भूमिकाही लिलया पेलल्या.

'अचानुरंगाथा वीडू' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना केरळ राज्याचा 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अदमिन्ते माकन अबू' या चित्रपटातील त्यांच्या हृदयस्पर्शी भूमिकेसाठी त्यांना 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' आणि 'केरळ राज्य चित्रपट पुरस्कारा'ने (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सन्मानित करण्यात आले. 'कुडोथ्रम' या चित्रपटात त्यांनी के. के. उत्तमन या आमदाराची साकारलेली भूमिका ही त्यांची शेवटची कलाकृती ठरली.




Latest News