नवी दिल्ली
साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार मोहनलाल यांनी अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम: द कन्क्लुजन' या चित्रपटाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले असून, संपूर्ण स्टार कास्ट आणि दिग्दर्शकाला मोहनलाल यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 'दृश्यम' फ्रँचायझीचा अखेरचा भाग आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून लवकरच जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. प्रॉडक्शन हापने सोमवारी इन्स्टाग्रामवर मोहनलाल यांचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये मोहनलाल म्हणाले, "मी हा चित्रपट पाहिला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी या लाडक्या प्रवासाचा शेवट केला आहे, त्याने मी प्रभावित झालो आहे. अभिषेक पाठक, अजय देवगण आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन... खूप छान काम केले आहे." चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत असून, त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.