OUNE FESTIVAL 2026: १८ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतींच्या हस्ते ३८ व्या महोत्सवाचा शुभारंभ; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 51 m ago
पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३८ वे वर्ष, स्वर्गीय सुरेश कलमाडी यांना समर्पित असणार सोहळा
पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३८ वे वर्ष, स्वर्गीय सुरेश कलमाडी यांना समर्पित असणार सोहळा

 

पुणे 

पुण्याचा सांस्कृतिक श्वास मानला जाणारा ३८ वा 'पुणे फेस्टिव्हल' यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाच्या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे. या १२ दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन १८ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

या उद्घात्तन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच महोत्सवाच्या संरक्षक आणि प्रसिद्ध अभिनेत्री-नृत्यांगना हेमा मालिनी उपस्थित राहणार आहेत. फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी खासदार स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित असलेला हा सोहळा यंदा विशेष ठरणार असून, उद्घाटनाच्या वेळी त्यांच्या कार्यावर आधारित नऊ मिनिटांची लघुपट दाखवली जाणार आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण

महोत्सवादरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहेत. यामध्ये सुफी संगीत, केरळ महोत्सव, हिंदी हास्य कवी संमेलन, अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' आणि 'एमएचजे लाईव्ह' हे मुख्य आकर्षण असतील. यंदाचा 'सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान केला जाणार आहे, तर किरण शांताराम, अतुल पेठे, अरहवाज दमानिया आणि फ्लाईंग ऑफिसर निधी सुधीर अग्रवाल यांना 'पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड' जाहीर झाला आहे.



Latest News