टायगर ३ या सलमानच्या सुपरहिट सिनेमानंतर त्याचे चाहते वाट पाहतायत सिकंदर या त्याच्या आगामी सिनेमाची. २०२५ च्या ईदला सलमानचा हा आगामी सिनेमा रिलीज होतोय. हा सिनेमा अॅक्शनने पुरेपूर भरलेला आहे. त्याच्या या सिनेमाची शूटिंग दणक्यात सुरु झालीये. मुंबईत ४५ दिवस या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. त्यातच आता सलमान खान शूटिंग दरम्यान जखमी झाल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे नेमकं काय घडलंय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काही काळापासून सलमानचे चाहते त्याच्या तब्येतीला घेऊन काळजीत होते. याच कारण ठरलं इंटरनेटवर सतत व्हायरल होणारा व्हिडीओ. एका कार्यक्रमात सलमानला जागेवरून उठताना त्रास होत होता. तो व्हिडीओ बराच चर्चेत होता. याचं कारण आहे त्याच्या बरगड्यांना झालेली जखम. त्या कार्यक्रमात पाहायला मिळालं कि, त्याचा हातात सतत त्याच्या छातीजवळ जात होता. त्यानंतर सिकंदर सिनेमाबाबतीतील अनेक गोष्टी बाहेर आल्या. असं म्हटलं जात होतं कि, या दुखापतीमुळे सिनेमाच्या शूटिंगवर परिणाम होईल.
पण इतकी दुखापत होऊनही सलमानने सिनेमाचं शूटिंग थांबवलं नाहीये. सिकंदर सिनेमाचं शूटिंग तितक्याच जोराने सुरु आहे. त्याची कामाविषयीची निष्ठा पाहून त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत. आपल्याला झालेली दुखापत मोठी असूनही सलमानने त्याच्या कामाकडे दिलेलं लक्ष यामुळे त्याचं कौतुक होतंय. या सिनेमातील सलमानची भूमिका गर्विष्ठ आणि रागिष्ट असणार आहे असं म्हटलं जातंय. हा सिनेमा पुरेपूर अक्शनने भरलेला असून अनेकजण हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
या सिनेमात बाहुबलीमध्ये कट्टप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे असं म्हटलं जातंय. पण या बाबत सिनेमाच्या टीमने काहीच स्पष्टीकरण दिलं नाहीये.