बहीण-भावाचं नातं अतूट रहावं म्हणून दरवर्षी बहीण भावाला रक्षाबंधनाच्या सणाला ओवाळणी करून राखी बांधते. कितीही वाद-विवाद, भांडण असले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी सगळं काही विसरून बहीण-भाऊ एकत्रित येतात अन् हा सण मोठया उत्साहात साजरा करतात. देशभरात रक्षाबंधनाचा हा सण साजरा होतोय. त्यामध्ये पटौदी कुटुंबीय ही मागे नाहीत. सारा अली खानने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या नवाबी सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
रक्षाबंधन सेलिब्रेशन फोटो, नवाबी सेलीब्रेशन
नुकताच अभिनेत्री सारा अली खानने रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत . या फोटोमध्ये सारा अली खान सैफ अली खानच्या घरी दिसत आहे. सारा फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. तिच्या सिंपल आणि सुंदर लूकने लक्ष वेधून घेतलं.
एका फोटोमध्ये सारा अली खान तिचा भाऊ इब्राहीमला टिळा लावताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये आपल्या भाऊरायाला ओवाळणी करून राखी बांधताना दिसत आहे. साराने आपल्या छोट्या भावालाही राखी बांधली. त्या फोटोमध्ये अभिनेत्री करिना कपूरपण दिसून आली. यावेळी अभिनेत्री करीना कपूरच्या मांडीवर जेह बसलेला आहे. सारा अली खानने छोट्या भाऊराया जेहला देखील राखी बांधली.
रक्षाबंधन सेलिब्रेशन दरम्यान सैफ अली खान पण दिसून आला. रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशननंतर फॅमिली फोटो तो बनता है.. मग काय सारा अली खान, सैफ अली खान, करीना कपूर यांचा फॅमिली फोटो काढण्यात आला. हा फोटो सारा अली खानने शेअर केला आहे. नवाबी सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.