शाहरुखला मिळाला डिस्चार्ज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
शाहरुखला मिळाला डिस्चार्ज
शाहरुखला मिळाला डिस्चार्ज

 

अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडल्याने त्याला अहमदाबाद येथील के डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उष्माघाताचा त्रासामुळे शाहरुखला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शाहरुखला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्याचा कुटूंबासह हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २१ मे ला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात शाहरुख खानचा केकेआर संघ जिंकला. यानंतर शाहरुखने त्याच्या संपूर्ण संघासह मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं आणि रात्री उशिरा तो अहमदाबादच्या ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला. तिथेही संपूर्ण संघाचं आणि शाहरुखचं भव्य स्वागत झालं पण त्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली.

बुधवारी सकाळी शाहरुखची तब्येत बिघडल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पण तरीही त्याची प्रकृती न सुधारल्यामुळे त्याला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्याची बायको गौरी, त्यांची मॅनेजर पूजा ददलानी अभिनेत्री व केकेआर संघाची सहमालक जुही चावला आणि तिचे पती हे सगळे शाहरुखसोबत उपस्थित होते.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावल्यावर शाहरुख खानने अहमदाबादहून चार्टर्ड विमानाने रातोरात मुंबईत परतला. यावेळी त्याच्याबरोबर पत्नी गौरी खान व त्याची मॅनेजर पूजा बरोबर होती. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शाहरुख हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर छत्री धरल्याचे दिसत आहेत त्यानंतर गौरी आणि त्याची मॅनेजर गाडीमध्ये बसत आहेत.
 
जुहीने दिली अशी प्रतिक्रिया
आता मुंबईत परत आल्यावर शाहरुख आयपीएल फायनलला हजेरी लावणार कि नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. बुधवारी जुही चावलाने ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना शाहरुख अंतिम सामन्याला नक्की येईल असं सांगितलं होतं आणि त्याची प्रकृती सुधारल्याचं म्हंटलं होतं.