जुन्या हिंदी गाण्यांमधून अजूनही ऐकू येतात धार्मिक सौहार्दाचे सूर

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 2 Months ago
जावेद अख्तर, शकील बदायुनी, उस्ताद बडे गुलाम अली खान व साहिर लुधियानवी
जावेद अख्तर, शकील बदायुनी, उस्ताद बडे गुलाम अली खान व साहिर लुधियानवी

 

भारतात अलीकडे काही चित्रपटांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायांतील दरी वाढवून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रेक्षकही 'उदारमतवादी' आणि 'सांप्रदायिक' अशा दोन गटांमध्ये विभागलेले दिसतात. खरंतर १२५ वर्षं जुन्या असलेल्या बॉलीवूडने उर्दू, पारशी रंगभूमी यांच्यासह हिंदू पौराणिक आणि मुस्लिम परंपरांना गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याचदा यात धार्मिक सौहार्दाचे खूप चांगले उदाहरण पाहायला मिळते. अशाच काही उदाहरणांचे हे संकलन. 
 


जावेद अख्तर यांनी लिहिलेलं अनोखे कृष्णभजन
 
जावेद अख्तर यांनी आपल्या सर्जनशीलतेने अनेकवेळा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दिग्दर्शक एन. चंद्रा १९९३ मध्ये जेव्हा 'युगंधर' चित्रपट बनवत होते, तेव्हा जावेद अख्तर यांना चित्रपटाची गाणी लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना भगवान श्रीकृष्णावर आरती लिहिण्यास सांगितले होते. दिग्दर्शक आणि संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अशी अपेक्षा नव्हती की ते भगवान कृष्णावर सुंदर आरती लिहू शकतील. एक मुसलमान भगवान श्रीकृष्णावर आरती लिहू शकेल का? असा प्रश्न त्यांच्या मनात कदाचित आलाही असेल. मात्र, दुसऱ्या दिवशी जावेद अख्तर यांनी श्रीकृष्णावर लिहिलेली आरती सादर केली. सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्णाचे किती नावे माहित असतील? दोन, चार, सहा. मात्र, जावेद अख्तर यांनी या गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाची २० नावे घेतली. हे ऐकून तिथे उपस्थित सर्वच अवाक् झाले. 

जेव्हा जावेद अख्तरची कृष्ण आरती ऐकून संगीतकारांनी त्यांना विचारले की, 'भगवान कृष्णाची एवढी नाव आम्हालाही माहीत नाहीत, तुम्हाला कशी माहीत?' तेव्हा जावेद अख्तर यांनी त्यांना उत्तरं दिलं, "मी उर्दू वाचतो, म्हणून मला ही नावे माहिती आहेत. 'युगंधर' हे भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे, ज्याचा अर्थ युग बदलणारा आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णाची १०८ नावे आहेत, त्यापैकी गोविंद, गोपाल, मोहन आणि श्याम खूप लोकप्रिय आहेत." जावेद अख्तर यांनी लिहिलेली ही आरती आजही भगवान कृष्णाच्या भक्तांमध्ये लोकप्रिय आहे.  

वो कृष्ण कन्हैया मुरलीधर
मन मोह कुंज बिहारी है
गोपाल मनोहर दुख भंजन
घनश्याम अटल बनवारी है
वो कंस विनाशक महारथी

सुदर्शन चक्र के धारी है
बन कुंज बिहारी सावरिया
नंदलाला कान मुरारी है
हर रूप निराला है उसका
हर लीला उसकी न्यारी हैं

चित्रपट : युगांधर
संगीतकार : लक्ष्मिकांत शांताराम कुंडालकर  
गायक : अमित कुमार  
गीतकार : जावेद अख्तर  

शकील बदायुनी लिखित ‘ओ दुनिया के रखवाले…’

१९७२ मध्ये आलेल्या 'बैजू बावरा' या चित्रपटात रफ़ी यांनी गायलेल्या गीताचे हे बोल आहेत. मोहम्मद रफ़ी यांनी आपल्या मनमोहक आवाजाने भारतीय संगीतात योगदान दिले आहे. साउंडट्रॅकचा एक भाग म्हणून रिलीज झालेले हे गाणे एक अजरामर क्लासिक बनले आहे. तर, संगीतप्रेमींसाठी हे गाणे आजही आयकॉनिक आहे. जाणून घेऊयात या सुंदर रचनेमागील अर्थ.

'ओ दुनिया के रखवाले...' असं म्हणत चित्रपटातील नायक बैजू ईश्वराला कळकळीची विनंती करत सांगतो की, "माझ्या संघर्षाची कथा तू ऐक. आशा आणि निराशा या दोन रंगांनी तू हे जग बनवले. तू नाव (जहाज) बनवायला आम्हाला शिकवलं मात्र त्यासोबत तू वादळ (तुफान) देखील बनवलं. तू भेटीचा आनंद दिला मात्र वेगळ होण्याचं (जुदाई), लांब जाण्याचं दुखही दिलं." जगाचा भार आपल्याच खांद्यावर आहे असं वाटणाऱ्या नायक बैजूच्या भावना हे गीत सुंदरपणे व्यक्त करतं. हे गाणे भौतिक संपत्तीच्या अनिश्चिततेवर आणि आंतरिक शांतीचे महत्त्व यावर जोर देते. मोहम्मद रफी यांचे मंत्रमुग्ध करणारे आवाज हे गीत ऐकणाऱ्याला खोलवर घेऊन जाते. रचनेची सुखदायक चाल आणि गायकाचा आत्मा ढवळून टाकणारा आवाज या गाण्याला उत्कृष्ट नमुना बनवतो.

"ओ दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले
सुन दर्द भरे मेरे नाले
आश निराश के दो रंगों से दुनिया तूने सजाई
नय्या संग तूफ़ान बनाया मिलन के साथ जुदाई
जा देख लिया हरजाई
ओ लुट गई मेरे प्यार की नगरी अब तो नीर बहा ले
अब तो नीर बहा ले
ओ अब तो नीर बहा ले" 

चित्रपट : बैजू बावरा
संगीतकार : नौशाद अली
गीतकार : शकील बदायुनी
गायक : मोहम्मद रफ़ी

शकील बदायुनी लिखित ‘मन तड़पत हरि दरसन को आज…’

१९७२ मध्ये आलेल्या 'बैजू बावरा' या चित्रपटात मोहम्मद रफ़ी यांनी गायलेल्या आणि शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या गीताचे हे बोल आहेत. शकील बदायुनी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय गाणी दिली. त्यांनी लिहिलेली भजने आजही मंदिरात गायली जातात. भगवान कुष्णाला उद्देशून हे गाणे लिहिले आहे. या गाण्यातील पहिल्या कडव्यातून बदायुनी देवाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या मनाचा भाव दर्शवतात. गाण्याच्या माध्यमातून ते पुढे म्हणतात, 'देवा तुझ्याविना मी काहीच नाहीये. मी तुला विनंती करतो की तू माझ्या आतुर मनाची लाज ठेव. मी देखील तुझ्या दारावर आलेला एक संन्यासी आहे. तुझी नजर माझ्यावर कधी पडेल. तुझ्या दर्शनासाठी माझे मन व्याकूळ झाले आहे."      

मन तड़पत हरि दरसन को आज
मोरे तुम बिन बिगड़े सकल काज
आ, विनती करत, हूँ, रखियो लाज, मन तड़पत...

तुम्हरे द्वार का मैं हूँ जोगी
हमरी ओर नज़र कब होगी
सुन मोरे व्याकुल मन की बात, तड़पत हरी दरसन...

चित्रपट : बैजू बावरा
संगीतकार : नौशाद अली
गीतकार : शकील बदायुनी
गायक : मोहम्मद रफ़ी

उस्ताद बडे गुलाम अली खान लिखित ‘हरि ॐ तत्सत्’

१९५४ मध्ये आलेल्या अमर कीर्तन या चित्रपटातील उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी लिहिलेले हे भजन आहे. भक्तीची भावना वाढवणारे हे सुंदर भजन भगवंताच्या चरणी भक्ती अर्पण करण्याच्या उद्देशाने  लिहिलेले दिसते. 'हरि ॐ तत्सत्' या मंत्राचा शाब्दिक अर्थ 'हरि, तो आहे, सत्य आहे' असा होतो. परमात्म्याचा गौरव करण्याचा आणि त्याची उपस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न या भजनात दिसतो. आजही ध्यान आणि योगाच्या सरावादरम्यान भजनातील या मंत्राचा जप केला जातो. 

हरि ॐ तत्सत्
जपा कर जपा कर
जपा कर जपा कर
हरि ॐ तत्सत् हरि ॐ तत्सत्
हरि ॐ तत्सत् हरि ॐ तत्सत्।।

हरि ॐ में इतनी शक्ति भरी है,
चरण के छुए से अहिल्या तरी है
पुकारा था दिल से यही नाम उसने
हरि ॐ तत्सत्।।

चित्रपट : अमर कीर्तन
संगीतकार : शिव दयाल बातिश
गायक : गीता घोष रॉय चौधुरी (गीता दत्त)
गीतकार : उस्ताद बडे गुलाम अली खान  

साहिर लुधियानवी लिखित ‘हे रोम रोम मे बसने वाले राम…’

१९६८ मध्ये आलेल्या 'नील कमल' या चित्रपटातील हे गीत आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य असे की हे गाणे गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिले असून ते प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे चित्रीकरण मंदिरात झाले आहे. या चित्रपटात वहिदा रेहमान यांनी राजकुमारी नील कमल म्हणजेच सीतेची भूमिका केली होती. हा चित्रपट त्या काळातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. नुकतेच अयोध्या येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना झाली त्या दरम्यानही हे गाणे वाजवले गेले. 

हे रोम रोम मे बसने वाले राम,
जगत के स्वामी, हे अन्तर्यामी,
मे तुझ से क्या माँगू ।
आप का बंधन तोड़ चुकी हूँ ,
तुझ पर सब कुछ छोड़ चुकी हूँ ।
नाथ मेरे मै, क्यूं कुछ सोचूं,
तू जाने तेरा काम॥
जगत के स्वामी, हे अन्तर्यामी,
मे तुझ से क्या माँगू ।
हे रोम रोम मे बसने वाले राम ॥

चित्रपट : नील कमल
संगीतकार : रविशंकर शर्मा
गायिका : आशा भोसले
गीतकार : साहिर लुधियानवी  

शकील बदायुनी लिखित ‘मधुबन में राधिका नाचे रे’

१९६० मध्ये आलेल्या 'कोहीनूर' या चित्रपटातील हे गीत आहे. हा तो काळ होता जेव्हा चित्रपटांमध्ये राग-रागिणींवर आधारित शुद्ध शास्त्रीय संगीत असायचे. चांगली गोष्ट ही होती की लोक ही गाणी मनापासून ऐकायचे आणि लक्षातही ठेवायचे. या चित्रपटातील शास्त्रीय संगीताने भरलेले 'मधुबन में राधिका नाचे रे' हे गाणे आजही अनेक ज्येष्ठांच्या ओठावर आहे. या गाण्याचे बोल शकील बदायुनी यांनी लिहिले असून नौशाद यांनी ते संगीतबद्ध केले आहे. राधा आणि गोपिकांच्या नृत्याच वर्णन या गीतात केलेलं दिसतं.  

मधुबन में राधिका नाचे रे 
गिरधर की मुरलिया बाजे रे 
मधुबन में...

पग में घुँघरू बाँधके, आ...
पग में घुँघरू बाँधके
घुँघटा मुख पर डाल के
नैनन में कजरा लगाके रे
मधुबन में...

चित्रपट : कोहीनूर
संगीतकार : नौशाद अली
गायक : मोहम्मद रफ़ी
गीतकार : शकील बदायुनी  

जावेद अख्तर लिखित ‘ओ पालनहारे…’

२००१ मध्ये आलेल्या 'लगान' या चित्रपटातील हे भजन आहे. जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतात देवाला प्रार्थना केलेली आहे. या गाण्यात देवाला संबोधत गीतकार लिहितात की, 'हे ईश्वरा सगळ्यांचे पालनपोषण करणारा तूच आहेस. तू रज, सत्व आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे. तू निर्गुण आणि सगळ्यांपासून वेगळा आहे. हे देवा, आमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर कर. तुझ्याशिवाय आमचं या जगात कोणीही नाही.'

ओ पालनहारे
निर्गुण और न्यारे
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं
हमरी उलझन, सुलझाओ भगवन
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

तुम्हीं हमका हो संभाले
तुम्हीं हमरे रखवाले
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं

चित्रपट : लगान 
संगीतकार : ए. आर. रहमान
गायक : लता मंगेशकर 
गीतकार : जावेद अख्तर    

जावेद अख्तर लिखित ‘पल-पल है भारी वो विपदा है आई…’

२००४ मध्ये आलेल्या ‘स्वदेस’ या चित्रपटातील हे गीत आहे. जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतात भगवान रामाला प्रार्थना केली आहे. गीतकार लिहितात, “माझ्यावर संकट आलं आहे. माझ्यासाठी हा प्रत्येक क्षण दुखद आहे. या संकटातून मला वाचवण्यासाठी भगवान राम तुम्ही या. भगवान राम तुम्ही माझ्या मनाचे स्वामी आहात. मी सदैव तुमचे नामस्मरण करत असते. ऐका माझं आणि या संकट समयी धावून या”   

पल-पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई

आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्री राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम जी

चित्रपट : स्वदेस
संगीतकार : ए. आर. रहमान
गायक : आशुतोष गोवारीकर, मधुश्री, विजय प्रकाश   
गीतकार : जावेद अख्तर

जावेद अख्तर लिखित ‘मेरे सारे पलछिन सारे दिन…’

२००६ मध्ये आलेल्या ‘डॉन’ या चित्रपटातील हे गीत आहे. जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतात गणेश विसर्जनाचे वर्णन केलेले आढळते. गीतकार लिहितात, “देवा तुला परत पुढच्या वर्षी यावंच लागणार आहे. आमच्या भुकेल्या नजरा तुझ्या प्रतीक्षेत असतील. मी तुझा भक्त तुला सांगतोय की पुढच्या वर्षी तू आल्यावर जेव्हा मी तुझं दर्शन घेईल तेव्हाच मला चैन पडेल.”    
 
मेरे सारे पलछिन सारे दिन 
तरसेंगे.. सुन ले तेरे बिन 
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा 
अगले बरस आना है आना ही होगा 
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा 
अगले बरस आना है आना ही होगा 
देखेगे तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें 
तो मान ले तू मान भी ले कहना मेरा 
लौट के तुझको आना है सुनले कहता दीवाना है 
जब तेरा दर्सन पायेंगे चैन तब हमको पाना है

चित्रपट : डॉन
संगीतकार : शंकर एहसान लॉय
गायक : शंकर महादेवन
गीतकार : जावेद अख्तर 

जावेद अख्तर लिखित ‘मन मोहना मन मोहना…’   

२००८ मध्ये आलेल्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटातील हे गीत आहे. जावेद अख्तर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतात भगवान कृष्णाचे वर्णन केलेले आढळते. गीतकार लिहितात, “देवा दिवसरात्र मी तुझ्या भेटीसाठी आतुर असते. तुझ्याविना मला चैन पडत नाही. तुझी काशी आणि मथुरा सोडून तू इथे येऊन बस, माझं मन तुझ्या भेटीसाठी आतुर झालंय.”     

मन मोहना मन मोहना
कान्हा सुनयना आए
तुम बिन पाउन कैसे चैना
तरसु तुमहीको दिन रैन

छोड़के अपने काशी मथुरा
आके बसाओ मोरे नैन
तुम बिन पाउन कैसे चैना
कान्हा तरसु तुमहीको दिन रैन

चित्रपट : जोधा अकबर 
संगीतकार : ए. आर. रहमान
गायक : बेला शेंडे 
गीतकार : जावेद अख्तर   
 
 
- छाया काविरे
 

 

आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter