मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 19 d ago
गुढी पाडवा
गुढी पाडवा

 

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी हा शुभ दिवस मानला जातो.विशेषतः सोने, वाहने,इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची सर्वाधिक खरेदी केली जाते .यंदाही त्यामुळे दिवसभर सराफ दुकांनांमध्ये,वाहनांच्या शोरुममध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये गर्दी पहिला मिळाली.पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या पी एन जी ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करण्यासाठी गर्दी पाहिला मिळाली.आजचा सोन्याचा दर ७१ हजार रुपये आहे.मात्र या दराचा कुठलाही परिणाम सोन खरेदीवर जाणवत नाही.

संभाजीनगरमध्ये गुढीपाडवा पहाट कार्यक्रम
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वर्धमान पतसंस्थेच्या वतीने गुढीपाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . बारा वर्षापासून शहरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडवा पहाट हा एकमेव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात गुढीपूजनाने करण्यात आली. गायक चैतन्य कुलकर्णी गायिका संमती धापटे शिंदे, अबोली गिरे यांच्या भारदार गायनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असे निवेदन स्नेहल दामले यांनी केले. या कार्यक्रमासाठी शहरातील दीड हजार लोक सकाळी सहा वाजता उपस्थित होते.

वांद्रे येथील शोभा यात्रेचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह महाराष्ट्रात नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात देखील अशाच नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म समभाव जोपासणारा गुढीपाडव्याचा अनोखा उत्सव वांद्रे परिसरात पाहायला मिळाला. वांद्रे येथील गोळीबार कब्रस्थान येथे मुस्लिम बांधवांकडून हिंदू नववर्षाची शोभायात्रा या परिसरातून जाताना तिथे पाणी वाटप करण्यात आले. यावेळी या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी पाणी देऊन समाजात एकात्मता आणि बंधुता असल्याचे प्रतीक दाखविणारे हे क्षण असल्याचे दिसुन आले. या शोभयात्रेचे मोठ्या उत्सहात मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आले. राजधानी नवी दिल्लीत देखील गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात आला. दिल्लीतील मराठी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.