लागली रमजान पर्वाची चाहूल

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इस्लामिक कालगणनेतील उर्दू शाबान महिना लागताच मुस्लिम बांधवांकडून रमजान पर्वाच्या पूर्व तयारी सुरू होत असते. 

इस्लाममध्ये रमजान पर्वास अनन्य साधारण महत्त्व आहे. रहेमत, बरकतचा महिना म्हणूनही ओळखला जातो. मोठ्या आतुरतेने मुस्लिम बांधव वर्षभर रमजान महिन्याची प्रतीक्षा करत असतात. अवघ्या काही दिवसांवर असा हा पवित्र महिना येऊन ठेपला आहे.

त्यानिमित्त मुस्लिम बांधवांकडून पूर्वतयारीस वेग आला आहे. काही मुस्लिम बांधवांकडून रमजान निमित्ताने दोन महिन्याचे उपवास (रोजा) केले जातात. अशा बांधवांचे उपवासास सुरवात झाली आहे. त्याचप्रमाणे उपवासाच्या काळात धावपळ होऊ नये.

यासाठी घरात धान्यसाठा करून ठेवला जात आहे. पर्वाच्या काळात आवश्यक असणाऱ्या पदार्थ, वस्तूंची मागणी लक्षात घेता दुकानदारांनीही व्यापाऱ्यांकडून त्या वस्तू आणि पदार्थाची मागणीचे ऑर्डर देण्यात येऊन दुकानात आगाऊ साठा करून घेतला जात आहे. महिलांकडून आत्तापासूनच घरातील आवश्यक ती कामे करण्यास सुरवात केली आहे.

अशा विविध तयारीसह मशीदमधील मौलवींनीही तयारी सुरू केली आहे. रमजान महिन्यातील तरावीच्या विशेष नमाज दरम्यान तोंडी कुराण शरीफ पठण केले जाते. त्यावर आधारित नमाज होत असते. अशा वेळेस कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये.

त्यानिमित्ताने मोल्वीनकडून कुराण शरीफचे पाठांतर केले जात आहे. मशिदीच्या विश्वस्तांकडून नमाजला होणारी गर्दी लक्षात घेता नमाजसाठीचे आवश्यक असलेले सर्व प्रकारचे नियोजन केले जात आहे.

अशा विविध प्रकारची तयारी होत असताना प्रत्येक मुस्लिम बांधवास रमजान पर्वाचे वेध लागले आहे. मोठ्या आतुरतेने त्यांच्याकडून पर्वाची प्रतीक्षा केली जात आहे. मार्च महिन्याच्या २४ तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अशाप्रकारे सर्वच क्षेत्रातील रमजान पर्वाची पूर्वतयारी होताना दिसून येत आहे. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त रमजान पर्व साजरा होणार असल्याने यंदाचा मुस्लिम बांधवांमधील आनंद अधिकच असणार आहे.