पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे दुपारचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये मोठे राजकीय बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तर तमिळनाडूमध्ये अभिनेते थलपती विजय यांच्या नव्या पक्षाने सर्वांना धक्का दिला आहे.
पश्चिम बंगालमधील २४६ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप सध्या १५९ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. तृणमूल काँग्रेस केवळ ८३ जागांवर पुढे आहे.
आसाममधील सर्व १२६ जागांचे कल समोर आले आहेत. येथे सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा भक्कम स्थितीत दिसत आहे. भाजप ८० जागांवर आघाडीवर आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला २४ जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय, बीओपीएफ (BOPF) १० तर आसाम गण परिषद ९ जागांवर पुढे आहे.
तमिळनाडूमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. एकूण २३३ जागांचे कल हाती आले आहेत. अभिनेते थलपती विजय यांच्या नुकत्याच स्थापन झालेल्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. हा पक्ष १०८ जागांवर पुढे आहे. अण्णाद्रमुक (AIADMK) ६३ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुक (DMK) पक्षाला मोठा फटका बसला असून ते फक्त ४१ जागांवर पुढे आहेत.
केरळमधील सर्व १४० जागांचे कल हाती आले आहेत. येथे काँग्रेसने ५६ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) ३० जागांवर पुढे आहे. तर मुस्लिम लीग १२३ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter