नवी दिल्ली
भारतात स्टारलिंकच्या (Starlink) सेवा सुरू करण्यापूर्वी त्याच्या किंमती अत्यंत परवडणाऱ्या ठेवाव्या लागतील, अन्यथा कोणीही ती खरेदी करणार नाही, असे स्पष्ट मत टेक अब्जाधीश इलन मस्क यांनी व्यक्त केले आहे. रिलायन्स जिओ आणि स्टारलिंकमधील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील आपल्या पोस्टमध्ये मस्क यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधला. एका बाजूला जिओच्या कमी किंमतींशी स्टारलिंक स्पर्धा करू शकत नाही असे म्हटले जाते, तर दुसरीकडे तो मोठा धोका असल्याचे भासवले जाते, अशी 'अब्जर्ड हायपोक्रसी' (भेकडपणा) असल्याचे मस्क म्हणाले. भारतात स्पर्धा वाढल्यास सरासरी नागरिकाला अधिक पर्याय मिळतील आणि मुकेश अंबानींचा व्यवसाय बंद पडणार नाही, असेही ते म्हणाले.
रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सचा आगामी आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ येत्या २१ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले आहे की, भारतात कोणत्याही एका कंपनीची मक्तेदारी चालत नाही. स्टारलिंक, जिओ सॅटकोम आणि वनवेब या तीन संस्थांना आधीच सॅटकॉमचे परवाने मिळाले असून सुरक्षा निकषांची पूर्तता केल्यानंतर त्या आपल्या सेवा सुरू करू शकतात.