परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या दूतावासाला भेट देऊन खामेनी यांना वाहिली श्रद्धांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासामध्ये भेट दिल्याचे क्षण
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासामध्ये भेट दिल्याचे क्षण

 

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांचे नुकतेच निधन झाले. या घटनेवर भारताने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारत सरकारच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाला सदिच्छा भेट दिली. तिथे त्यांनी खामेनी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.

दूतावासात ठेवण्यात आलेल्या अधिकृत शोकपुस्तिकेत विक्रम मिस्री यांनी नोंद केली. त्यात त्यांनी भारताच्या वतीने अधिकृतरीत्या शोक व्यक्त करत आपली स्वाक्षरी केली.

अयातुल्ला खामेनी यांनी तीन दशकांहून अधिक काळ इराणचे नेतृत्व केले. त्यांच्या राजकीय आणि धार्मिक नेतृत्वाखाली इराणने अनेक मोठे टप्पे पार केले. त्यांच्या जाण्याने इराणचे मोठे नुकसान झाले आहे.

या कठीण काळात भारत इराणच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे. असा भक्कम संदेश या भेटीतून देण्यात आला.

भारत आणि इराण यांच्यात शेकडो वर्षांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांनी एकमेकांना नेहमीच साथ दिली आहे. चाबहार बंदरासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमधून ही मैत्री अधिक घट्ट झाली आहे.

खामेनी यांच्या निधनामुळे दोन्ही देशांमधील या जुन्या आणि मजबूत संबंधांना उजाळा मिळाला आहे. विक्रम मिस्री यांनी इराणच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter