भारत-चेक प्रजासत्ताक द्विपक्षीय बैठकीत संरक्षण औद्योगिक सहकार्यावर भर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 53 m ago
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान कारेल हॅव्हलिचेक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चेक प्रजासत्ताकचे उपपंतप्रधान कारेल हॅव्हलिचेक

 

नवी दिल्ली

रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे चेक प्रजासत्ताकचे पहिले उपपंतप्रधान आणि उद्योग व व्यापार मंत्री कारेल हॅव्हलिचेक यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण औद्योगिक सहकार्याच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा आढावा घेतला.

संरक्षण औद्योगिक सहकार्यावर भर

भारत आणि चेक प्रजासत्ताक यांच्यात सुरू असलेल्या सहकार्याचे आणि विविध संयुक्त प्रकल्पांच्या यशस्वी स्थापनेचे दोन्ही बाजूंनी स्वागत करण्यात आले. 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत-चेक संयुक्त रक्षा समितीच्या अंतर्गत हे सहकार्य आणखी विस्तारण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.

शांतता आणि सुरक्षेवर चर्चा

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आणि प्रादेशिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचे मान्य केले. भारत आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील भागीदारी ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांवर तसेच परस्पर विश्वास आणि आदराच्या सामायिक मूल्यांवर आधारित असल्याचे त्यांनी पुनरच्चारले. कारेल हॅव्हलिचेक हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते विविध मंत्रालये आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेत आहेत.