झाकीउद्दिन सुलेमानजी
मुंबईचे रहिवासी झाकीउद्दिन भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
झाफारमिया रफिकमिया
झाफारमिया यांचा जन्म १९९२ मध्ये नागपुरात झाला. दिनांक ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते सक्रियपणे सहभागी झाले. दिनांक १५ ऑगस्ट १९४२ रोजी ते एका ब्रिटिशांविरोधी काढलेल्या मिरवणुकीत सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
युसुफ अली इब्राहीमजी
मूळ मुंबईचे असलेल्या युसुफ यांचा जन्म १९१० मध्ये झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
यासीन फतेह
यासीन हे मुंबईचे रहिवासी होते. दिनांक २३ जानेवारी १९४६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ निघालेल्या मोठ्या मिरवणुकीत ते सामील झाले. मिरवणूक सैंडहर्स्ट रोड, मुंबईच्या चौपाटीपासून निघाली होती. मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अडवले. त्यांनी रस्त्यावर बॅरिकेड लावले होते. मिरवणूक विठ्ठलभाई रोडच्या दिशेने वळवावी अशी पोलिसांची इच्छा होती. राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलक बॅरिकेडजवळ बसले. त्यांच्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि नंतर अंदाधुंद गोळीबार केला. यासीन गोळी लागून गंभीर जखम झाले आणि त्याच दिवशी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
वझीर खान
नाशिकच्या पेठ येथील रहिवासी वझीर यांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला. ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी त्यांनी लोकांना प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा, तसेच देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
विलायत अली खान
सातारा येथील रहिवासी विलायत हे आधी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी त्यांची सातारा येथे नियुक्ती झाली होती. तिथे ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांसोबत सामील झाले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक ५ ऑगस्ट १८५७ मध्ये त्यांना काळ्यापाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक ५ सप्टेंबर १८५९ रोजी अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
उस्मान शेख
उस्मान यांचा जन्म १९२० मध्ये नागपूरच्या गुमगाव येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी नागपुरात दिनांक १४ ऑगस्ट रोजी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फझल मोहम्मद
फझल यांचा जन्म १९३० मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
सुलेमान शाह
सुलेमान यांचा नाशिकच्या मालेगाव येथे जन्म झाला. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तिथेच त्यांना दिनांक ६ जुलै १९२२ रोजी फाशी देण्यात आली.
सुफनिका रेहमान
सुफनिका यांचा जन्म १९२३ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
शय्याद छोटु
शय्याद यांचा जन्म १९२० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच, ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये ते सहभागी होते. दिनांक ९ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेख मुम्मो
मुम्मो हे मुंबईचे रहिवासी होते. ते आधी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई म्हणून काम करत होते. १८५७ च्या उठावात ते क्रांतिकारकांमध्ये सामील झाले. इतरांनाही त्यांनी प्रोत्साहित केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. एप्रिल १८५८ मध्ये काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना दिनांक ७ जुलै १९८५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
शेख केसर अझीझ
शेख केसर अझीझ यांचा जन्म १९२७ मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच, ब्रिटिशविरोधी विविध कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेख अली अरब
औरंगाबाद येथील रहिवासी शेख अली हे १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांसोबत सामील झाले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला आणि नोव्हेंबर १८५७ रोजी त्यांना काळया पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. १८५७ मध्ये त्यांना अंदमानला पाठवण्यात आले. अंदमान येथेच ऑगस्ट १८५९ मध्ये कैदेत त्यांचा मृत्यू झाला.
शेख गुलाम मोहिउद्दिन
गुलाम यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दिनांक २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
रेहमान खान
महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी रेहमान इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात होते. ते सातारा येथे तैनात होते परंतु, १८५७ च्या उठावात परकीय राजवटीपासून स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी ब्रिटिशांशी अनेक प्रसंगी लढा दिला. साताऱ्यात २४ जून १८५७ रोजी बंडखोरीसाठी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १२ जून १८५८ रोजी त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले. १० जुलै १८५९ रोजी कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला.
रहीमतुल्ला इस्माईल
रहीमतुल्ला यांचा जन्म १९११ मध्ये मुंबई येथे झाला. ते भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमध्ये सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबईतील मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रहीमभाई
रहीमभाई यांचा जन्म चिमूर (जि. चंद्रपूर) येथे झाला. ऑगस्ट १९४२ मध्ये सुरू झालेल्या ब्रिटिशविरोधी छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमूर पोलीस स्टेशनकडे निघालेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ओमार / उमर खान
ओमार हे बडोदा (गुजरात) येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध आंदोलकांना सामील झाले. गुजरात येथील आंदोलकांना त्यांनी हत्यारांची मदत केली. ते विविध ठिकाणी ब्रिटिशांविरोधात लढले आणि इतरांनीसुद्धा आंदोलनात सामील व्हावे, म्हणून त्यांनी प्रोत्साहित केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची, आंदोलकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्याविरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
निजामुददीन
निजामुददीन हे मुंबईचे रहिवासी होते. डिसेंबर १९३० मध्ये मुंबई येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. १३ डिसेंबर १९३० रोजी बाबू गेनू यांच्या अंतयात्रेत ते सामील झाले. मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये गंभीर ते जखमी झाले. निजामुद्दीन यांना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तेथे दि. १८ डिसेबर १९३० रोजी त्यांचे निधन झाले.
नवसती असगर मिया
१९१९ मध्ये मुंबई येथे जन्मलेले नवसती भारतीय नौदलनाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनामध्ये सामील झाले होते. त्या मिरवणुकीत सहभागी असताना ते गंभीर जखमी झाले. जे. जे. रुग्णालयात २३ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
नवाब कादिर अली खान
नवाब कादिर हे नागपूरचे रहिवासी होते. १८५७ च्या उठावात त्यांनी भाग घेतला. आपल्या सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत केली आणि अनेक ठिकाणी ब्रिटिश आस्थापनांवर हल्ले केले. बंडखोरावर हल्ला करताना कंपनीच्या सैन्याने त्यांना पकडले आणि त्यांच्यावर देशद्रोह आणि बंडाचा आरोप लावला. त्यांना फाशीची शिक्षा सुनविण्यात आली व २१ जून १८८२ रोजी फाशी देण्यात आली.
मुहसीन
मुहसीन यांचा जन्म १९३४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद शबान भिकारी
मोहम्मद हे नाशिकजवळील मालेगाव येथील रहिवासी होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. दारूच्या दुकानांवर बहिष्कार करणे, लोकांना संघटित करणे, अशा महत्त्वाच्या भूमिका त्यांनी बजावल्या. आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात डांबले. त्यांनी शिपायांवर हल्ल्या केला असा त्यांच्यावर आरोप लावून त्यांना ६ जुलै १९२२ रोजी येरवाडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
मोहम्मद हुसेन
मोहम्मद हे नाशिकजवळील मालेगाव येथील रहिवासी होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. दारूच्या दुकानांवर बहिष्कार टाकणे, लोकांना संघटित करणे, अशा महत्त्वाच्या भूमिका त्यांनी बजावल्या. आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना अटक केली. तेथे पोलिसांच्या अमानुष छळामुळे १९२२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद हुसेन मुन्शी
मुन्शी हे पुणे येथील रहिवासी होते. ते मुरूल दुदा यांच्या नेतृत्वाखाली १८५७ मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांसोबत सामील झाले. त्यांनी अनेकवेळा ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यात भाग घेतला. बऱ्याच ठिकाणी इंग्रजांविरुद्ध शिपायांचे बंड सुरू केले. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि आरोप करून त्यांना १४ ऑगस्ट १८५७ रोजी फाशी देण्यात आली.
मोहम्मद अब्दुल गफूर
मोहम्मद हे नाशिकजवळील मालेगाव येथील रहिवासी होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. दारूच्या दुकानांवर बहिष्कार करणे, लोकांना संघटित करणे, अशा महत्त्वाच्या भूमिका त्यांनी बजावल्या. आंदोलन करताना पोलिसांनी त्यांनी अटक केली. त्यांच्यावर हल्ल्याचा आरोप लावून १८ जानेवारी १९२३ रोजी त्यांना येरवाडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
मोहम्मद अझीझ
मोहम्मद अझीझ यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद वजीर
मोहम्मद वजीर यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद सिद्धिक
सिद्धिक यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या कामाठीपुरा येथील एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मोहम्मद हुसेन आदमजी
मोहम्मद हुसेन यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मीर फिदा
मीर है औरंगाबाद येथील रहिवासी होते. ते आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत होते. पण, १८५७ च्या उठावात त्यांनी कंपनी सोडली आणि क्रांतिकारकांसोबत सामील झाले. त्यांनी औरंगाबाद येथे बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला. २४ जून १८५७ रोजी त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्याचदिवशी सगळ्यांसमोर त्यांना फाशी देण्यात आली.
मेधी खान
मेधी हे मुंबईचे रहिवासी होते. १८५७ च्या उठावात ते स्वातंत्र्य सैनिकांसोबत सामील झाले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांविरोधात लढा दिला. ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही प्रवृत्त केले. ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी ते पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला. २३ जानेवारी १८५८ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि १२ जून १८५८ रोजी अंदमान येथे पाठवण्यात आले. ४ एप्रिल १८५९ रोजी अंदमान येथे कैदेत ते मरण पावले.
मिनसाहेब खुर्द
मिनसाहेब हे औरंगाबादचे रहिवासी होते. ते १८५७ च्या उठावात सामील झाले आणि औरंगाबादच्या वेगवेगळ्या भागांतून इंग्रजांविरुद्ध लढले. ९ एप्रिल १८७० रोजी निर्मल भागाच्या दिशेने येणाऱ्या इंग्रज सैन्याशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले.
मंजूर अहमद
मंजूर यांचा जन्म १९२७ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
जमाल मोहम्मद
जमाल हे १९२६ मध्ये मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
इस्राईल अल्लारखाँ
मालेगाव येथे १८९२ मध्ये जन्माला आलेले इस्राईल हे एका खाजगी कंपनीत कामाला होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तिथेच त्यांना दि. ६ जुलै १९२२ रोजी फाशी देण्यात आली.
इमाम अली जोखम
इमाम यांचा १९०६ मध्ये मुंबईत जन्म झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याचदिवशी त्यांचा मृत्यू झाला.
हुसैन इस्माईल
हुसैन यांचा १९३४ मध्ये मुंबईत जन्म झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
हाशीम मोहम्मद
हाशीम यांचा जन्म १९२२ मध्ये नागपूरात झाला. त्यांनी १९४२ मध्ये असहकार आंदोलनात नागपूर येथे भाग घेतला. दि. १२ ऑगस्ट १९४२ रोजी ते एका ब्रिटिशांविरोधी मिरवणुकीत सामील झाले. त्यात झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
गुलाम हुसेन अली मोहम्मद
गुलाम यांचा जन्म १९०६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
दिन मोहम्मद अब्दुल अली
दिन मोहम्मद हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांचा जन्म १९२९ मध्ये झाला. भारतीय नौदलाच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ ते आंदोलनात सहभागी झाले. या दरम्यान दिनांक २३ फेब्रुवारी १९४६ मध्ये नागपाडा, मुंबई येथे निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात त्यांचे निधन झाले.
दिलदार खान
दिलदार यांचा जन्म नागपूर येथे झाला. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही इंग्रजांविरुद्ध प्रोत्साहित केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने त्यांना पकडले. त्यांच्यावर देशद्रोह व ब्रिटिश राजवटीविरुद्ध कटाचा आरोप ठेवून त्यांना १८६२ मध्ये फाशी देण्यात आली.
छोटू अझीझ
छोटू यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
चांदसाहेब पटावेदार
चांदसाहेब यांचा जन्म १९०५ मध्ये सांगली जिल्ह्यातील आरळे येथे झाला. ते शेतकरी होते. दि. ८ ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटीशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ सोडण्यात आले. परंतु, त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.
बुधू फरीदीन
बुधू यांचा जन्म नाशिकजवळील मालेगाव येथे झाला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकर आंदोलनात सामील झाले. नागपुरातील दारुच्या दुकानांवर बहिष्कार करताना पोलिसांकडून त्यांना धरपकड करण्यात आली. त्यांनतर येरवडयाच्या तुरुंगात अटकेत असताना १८५९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अली मोहम्मद
अली यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील चिरनार येथे १९०६ मध्ये झाला. चिरनार येथील महाराष्ट्रातील सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अक्कादेवी मैदान, चिरनार येथे ते सामील झाले. दि. २५ सप्टेंबर १९३० रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
अबुकर मोहम्मद
अबुकर यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल रहमान
अब्दुल यांचा जन्म १९१६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल खलिफा
अब्दुल हे मालेगाव येथे १८९२ मध्ये जन्माला आले. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. पोलीस आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि तीन वर्षाची शिक्षा होऊन त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तेथील पोलिसांच्या अत्याचारामुळे १९२१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल रझाक अजीज
अब्दुल यांचा जन्म १९१६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल सत्तार मुहम्मद उमर
अब्दुल सत्तार यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने सोलापुरातील ब्रिटिशांविरोधी पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल रसूल रशीद
अब्दुल रसूल यांचा जन्म १९१० मध्ये सोलापूर येथे झाला. त्यांनी सोलापुरातील पोलीस ठाण्यावर हल्ला आणि दंगल घडवून आणली. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि. ८ मार्च १९३० रोजी सोलापुरातील ब्रिटिशांविरोधी निदर्शनात पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दि. १२ जानेवारी १९३१ रोजी त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
अब्दुल रहमान अजीज
अब्दुल रहमान यांचा जन्म १९११ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल रशीद
अब्दुल रशीद यांचा जन्म १९१० मध्ये सोलापूर येथे झाला. तिथे व्यापार युनियन कामगारांच्या आंदोलनात दि. ८ मे १९३० रोजी त्यांना अटक करण्यात आली. सोलापुरातील पोलीस ठाण्यावर हल्ला आणि दंगल घडल्याचा आरोप करून अब्दुल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दि. १२ जानेवारी १९३१ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.
अब्दुल रहमान
अब्दुल रहमान यांचा जन्म १९३१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल कादर
अब्दुल कादर यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल नरुद्दीन
नरुद्दीन यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. २४ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल गनी
अब्दुल गनी यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अजीज अब्दुल
अजीज यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल मलिक दिलावर
अब्दुल मलिक यांचा जन्म १९३१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. २४ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल करीम
अब्दुल करीम यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. २४ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.