७५व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मुस्लीम मान्यवरांकडून मोदींवर प्रेमाचा वर्षाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
मुस्लीम मान्यवरांकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुस्लीम मान्यवरांकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात मुस्लीम सेलिब्रिटी आणि नेत्यांचाही समावेश आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि सेवेसाठी केलेल्या मोदींच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शुभेच्छा देताना लिहिले आहे की, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राष्ट्रसेवा आणि देशातील नागरिकांच्या सेवेसाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो."
 
राजस्थानमधील अजमेर शरीफचे दिवान सय्यद नसीरुद्दीन चिश्ती यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, "मी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. संपूर्ण देश सेवा पखवाड्याच्या स्वरूपात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यामागे एकच हेतू आहे – सेवा. कोणाच्याही दबावाखाली न झुकणारा नवा भारत त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे आला आहे."

क्रिकेटपटू युसूफ पठाण याने सोशल मीडियावर लिहिले की, "आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो."

अभिनेता आमिर खान याने व्हिडीओद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तो म्हणाला की, "आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. भारताच्या विकासासाठी केलेले योगदान नेहमी स्मरणात राहील. या आनंदाच्या प्रसंगी आम्ही आपल्या दीर्घायुष्याची आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत राहण्याची प्रार्थना करतो."

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान व्हिडीओमध्ये म्हणाला, "आज पंतप्रधान मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. एका छोट्या शहरातून जागतिक पातळीपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. शिस्त, मेहनत आणि देशासाठीची समर्पणभावना या प्रवासात दिसून येते. ७५ व्या वर्षी त्यांची ऊर्जा आमच्यासारख्या तरुणांनाही मागे टाकते. ते सदैव निरोगी आणि आनंदी राहोत ही प्रार्थना करतो."

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने शुभेच्छा देताना म्हटले की, "पंतप्रधान मोदी, तुम्हाला आगामी वर्ष उत्तम जावो. देव तुम्हाला उत्तम आरोग्य देवो. जसं तुम्ही आत्ता देशासाठी काम करत आहात तसंच पुढेही करत राहा हीच प्रार्थना."