पंतप्रधानांनी साधला अमिताभ, रजनीकांत, शाहरुख आणि अन्य कलाकारांशी संवाद

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हजच्या सल्लागार मंडळाशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हजच्या सल्लागार मंडळाशी संवाद साधला.

 

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वेव्हजच्या सल्लागार मंडळाशी संवाद साधला. अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ, रजनीकांत, शाहरुख खान, रणबीर कपूर, चिरंजीवी, अनिल कपूर, अक्षय कुमार, अनुपम खेर, एआर रहमान तसेच महिला कलाकारांसह आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. 

वेव्हज समिट हा कार्यक्रम भारत आणि जगभरातील व्यावसायिकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केला गेला आहे. भारताने ५ ते ९ फेब्रुवारी मध्ये पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) चे आयोजन करत आहे. 

डिसेंबर २०२४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या ११७ व्या भागात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट (वेव्हज) शिखर परिषदेच्या सुरुवातीची घोषणा केली होती. यावेळी ते म्हटले होते, “भारताला जागतिक सामग्री निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील वर्षी होणाऱ्या शिखर परिषदेत  सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना सहभागी व्हावे.” 

पुढे ते म्हणाले, "पुढच्या वर्षी, पहिल्यांदाच, आपल्या देशात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच WAVES आयोजित केले जाणार आहे. WAVES समिटमध्ये, मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील दिग्गज आणि सर्जनशील जगातील लोक भारतात येतील. ही समिट भारताला जागतिक सामग्री निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. मला तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो की या समिटमध्ये तरुण निर्माते देखील सहभागी होत आहेत.” 

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी वेव्हजच्या सल्लागार मंडळाशी संवाद साधला. याविषयी मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली. त्यांनी लिहले, “मनोरंजन, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या जगाला एकत्र आणणाऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या WAVES च्या सल्लागार मंडळाची एक विस्तृत बैठक नुकतीच संपली. सल्लागार मंडळाचे सदस्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. या सर्वांनी केवळ त्यांच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला नाही तर भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी कसे वाढवायचे याबद्दल सूचना सांगितल्या.” 
 
माहिती प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “वेव्हज - इंटरनॅशनल अॅनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (AFC) ची पहिली आवृत्ती एक अभूतपूर्व उपक्रम म्हणून उदयास आली आहे. यामुळे अॅनिमेशन, VFX, AR-VR आणि व्हर्च्युअल निर्मितीमधील निर्मात्यांना जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळाले आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा भाग म्हणून ८ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेने सर्वांनाच आकर्षित केले आहे. यामुळे सर्जनशील कथाकथन आणि तांत्रिक नवोपक्रमासाठी एक अग्रगण्य ठिकाण म्हणून वेव्हजची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे.” 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B) आगामी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचा (WAVES) प्रमुख कार्यक्रम असलेल्या अॅनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धेसाठी डान्सिंग अॅटम्ससोबत भागीदारी केली आहे. यामुळे भारताच्या सर्जनशील उद्योगात एका नवीन युगाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगासाठी वेव्हज हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter