बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पूर्व कीनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या उंच लाटा पावसाचा इशारा देत आहेत.
मुंबई आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली. पुढील २४ तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
काल अचानक आलेल्या वादळामुळे विदर्भातील चार जिल्ह्यात मोठ नुकसान झालं आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसला. काल अचनाक वादळी वारे आले व मोठा पाऊस बरसला. यामुळे उन्हाळी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विजेचे खांब पडल्यामूळे वीज देखील नाही. तर शेगावात वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून राज्यात लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. १० जूनला मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. तर ३१ मे ला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. १५ जूनला मान्सून मराठवाडा, विदर्भात येण्याची शक्यता आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आपत्कालीन व्यवस्थान कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. १ जूनपासून हा कक्ष सुरु होणार आहे. दुर्घटना घडल्यास अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत करता यावी, यासाठी हा कक्ष सुरु करण्यात येतो.