काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या दिशेने दगड भिरकवणारे हात आता यंत्रावर, मशिनवर काम करताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षात नंदनवनातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची हमी मिळत असल्याने बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती विधानसभेत सरकारच्या वतीने देण्यात आली.
राज्यात २०१९-२० मध्ये ६.७ टक्के बेरोजगारीचा दर असताना २०२३-२४ मध्ये तो ६.१ टक्क्यांवर आला आहे. राज्य सरकारने विविध योजना आणल्याने राज्यातील ९.५८ लाख नागरिकांना रोजगार मिळाल्याचे सांगण्यात आले.
कॅबिनेट मंत्री जावेद अहमद दार यांनी राज्यातील बेरोजगारीच्या दरात सुधारणा झाल्याचे सांगितले. कामगारशक्तीचा सहभागाचा दर आणि कामगारसंख्येचे प्रमाण वाढले असून ते २०२२-२३ मध्ये अनुक्रमे ६४.३ टक्के आणि ६०.४ टक्क्यांवर पोचले आहे. ही आकडेवारी राज्यातील रोजगाराची संधी आणि आर्थिक उलाढालीत झालेली वाढ दर्शविते.
२०१९नंतर वाढ नाही
मंत्री जावेद अहमद दार यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार मुबारक गुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, "जम्मू काश्मीरमध्ये २०१९ नंतर बेरोजगारीच्या दरात अधिक वाढ झालेली नाही." जम्मू काश्मीर लोकसेवा आयोग आणि जम्मू काश्मीर निवड मंडळाकडून गेल्या दोन वर्षात ११, ५२६ जागांची भरती करण्यात आली. २०२३ मध्ये ४८३६ जागा, तर २०२४ मध्ये ६६९० जागा भरण्यात आल्या. याशिवाय खासगी क्षेत्रात २०२२-२३ मध्ये ४५,६८८ बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत ९.५८ लाख जणांना रोजगारांच्या संधीचा लाभ मिळाला, असल्याचेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
गेल्या चार वर्षात २४६ रोजगार मेळ्याचे आयोजन केले आणि यात २७६० कंपन्यांनी ४८९३ जणांना नोकरी दिली आणि ६६४० उमेदवारांची कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. सरकार आता विविध विभागाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच संपूर्ण राज्यात कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे.
साडेनऊ लाखांहून चार वर्षांत अधिक रोजगार
जम्मू काश्मीर लोकसेवा आयोग आणि जम्मू काश्मीर निवड मंडळाकडून गेल्या दोन वर्षात ११, ५२६ जागांची भरती करण्यात आली. २०२३ मध्ये ४८३६ जागा, तर २०२४ मध्ये ६६९० जागा भरण्यात आल्या. याशिवाय खासगी क्षेत्रात २०२२-२३ मध्ये ४५,६८८ बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात ९.५८ लाख जणांना रोजगारांच्या संधीचा लाभ मिळाला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter