शेअर मार्केटची तेजीत सुरुवात...

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Years ago
शेयर मार्केट
शेयर मार्केट

 

सोमवारी व्यवहार बंद होताना मंदीत असणारा बाजार, आज सुरू होताच तेजीत दिसून आला. आज शेअर मार्केटमध्ये दिवसभर असाच ट्रेंड राहण्याची शक्यता आहे. तसेच, आज ऑटो कंपन्यांचे शेअर्स तेजीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

सेन्सेक्स-निफ्टीत मोठी वाढ

आज सकाळी शेअर मार्केट उघडताना सेन्सेक्स २३५.५२ अंकांनी वाढून, ६३,२०५.५२ अंकावर पोहोचला आहे. तर, निफ्टीदेखील ७२. अंकांनी वाढून, १८,७६३.६० अंकांवर पोहोचला आहे.

आज सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २१ शेअर्स ग्रीन झोनमध्ये दिसत आहेत. तर, ९ शेअर्स हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ४३ शेअर्स तेजीत आहेत. तर, ७ शेअर्स सध्या रेड झोनमध्ये आहेत.

 

दिवसभर तेजीची शक्यता

प्री-ओपनिंग सेशनपासूच आज शेअर मार्केट ग्रीन झोनमध्ये दिसत आहे. मार्केटमधील एकूण १,२८० शेअर्सपैकी केवळ २५० शेअर्स आज रेड झोनमध्ये दिसत आहेत. आज सकाळी दिसलेली स्थिती जर दिवसभर कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.