बँक कर्मचाऱ्यांचा ३ दिवसांचा देशव्यापी संप स्थगित; IBA च्या आश्वसनानंतर मोठा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसीय देशव्यापी संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) कडून मागण्या मान्य करण्याबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतर बँक युनियन्सने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवारपासून सुरू होणारा संप टळला असून बँकांचे कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे.

पाच दिवसांच्या आठवड्यावर होणार चर्चा

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, उरलेले सर्व शनिवार बँक सुट्टी जाहीर करण्याबाबत विचार करण्यासाठी IBA आणि UFBU ची एक उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन केली जाईल. ही समिती सर्व भागधारकांशी आणि ग्राहकांशी चर्चा करून सर्वांना मान्य असा पर्याय शोधून काढेल. तसेच Scale IV आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी PLI योजनेवरही चर्चा सुरू ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे.

मार्च २०२४ मधील बैठकीत ठरलेल्या इतर प्रलंबित मुद्यांवरही लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व सकारात्मक घडामोडींमुळे बँक युनियन्सने नियोजित आंदोलने आणि संप कृती स्थगित केल्याची घोषणा केली आहे.