राष्ट्रपित्याच्या नावे भरणाऱ्या देशातील एकमेव यात्रेस सुरूवात

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
शिरूर अनंतपाळ
शिरूर अनंतपाळ

 

शिरूर अनंतपाळ : उजेड (ता. शिरूर अनंतपाळ) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रेला सोमवारपासून (ता. २३) सुरवात झाली. साधारणतः आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत धार्मिक,सामाजिक कार्यक्रमव विविध स्पर्धा होतील. राष्ट्रपित्याच्या नावे भरणारी देशातील ही एकमेव यात्रा आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची जोपासना व्हावी, त्यांच्या विचारांचा जागर करून पुढील पिढीला दिशा मिळावी,या उद्देशाने प्रजासत्ताक दिनानिमित्त म. गांधीबाबा यात्रा भरवली जाते. यंदा ती२३ जानेवारीपासून  सुरू झाली असून २७ जानेवारीपर्यंत चालेल. दरवर्षी यात्रेच्या पहिल्या दिवशी पशूप्रदर्शन व पशूरोगनिदान शिबिर घेतले जाते. या  वेळी ते रद्द करण्यात आलेअसून  त्याऐवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आलेआहे. २४ जानेवारीला गांधीबाबा मूर्तीची स्थापना, सर्व रोगनिदान शिबिर होईल. २५ जानेवारीला शालेय क्रीडा स्पर्धा व भजन होईल. २६ जानेवारीला प्रभातफेरी, ध्वजवंदन, वाद्य, गायन स्पर्धा, बक्षीस वितरण व मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. २७ जानेवारीला कुस्ती स्पर्धा, गायन स्पर्धा, मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. दरम्यान,३० जानेवारीला महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून यात्रेची सांगता होईल, अशी माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली.