MAH SIR: ९३ टक्क्यांहून अधिक फॉर्मचे वाटप, ८ ऑगस्ट अंतिम मुदत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 13 h ago
मुंबईत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम पाहणारे निवडणूक अधिकारी.
मुंबईत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम पाहणारे निवडणूक अधिकारी.

 

मुंबई

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेत मोठी प्रगती झाली असून आतापर्यंत ९३ टक्क्यांहून अधिक enumeration forms चे वाटप करण्यात आले आहे, तर सुमारे ७३ टक्के फॉर्म्सचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. आगामी ८ ऑगस्ट ही या मोहिमेची अंतिम मुदत असून राज्य निवडणूक आयोगाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.

वर्धा आणि हिंगोली अव्वल, शहरी भाग पिछाडीवर

राज्य सरकारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) बुलेटिननुसार, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांनी फॉर्म वित्ताणात शंभर टक्के यश मिळवले आहे. मात्र, पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगर या प्रमुख शहरांमध्ये फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनची गती काहीशी मंदावलेली दिसून येत आहे. ३० जूनपासून सुरू झालेली ही SIR मोहीम येत्या ८ ऑगस्ट रोजी समाप्त होत आहे.

महाराष्ट्रात एकूण ९.७९ कोटी मतदार असून, त्यापैकी तब्बल ९.१८ कोटी (९३.७९ टक्के) फॉर्म्सचे वाटप पूर्ण झाले आहे. तसेच ७.१३ कोटींहून अधिक (७२.८९ टक्के) फॉर्म्सचे डिजिटायझेशन झाले असून राज्यभरात १ लाख २ हजार ५३ बूथ-लेव्हल अधिकारी (BLO) या कामात गुंतले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ९०.४७ टक्के डिजिटायझेशन झाले असून त्यापाठोपाठ रत्नागिरी, बुलढाणा आणि यवतमाळचा नंबर लागतो. याउलट, पुण्यात ५९.६७ टक्के, नागपूरमध्ये ५९.७७ टक्के, तर ठाण्यात सर्वात कमी म्हणजेच ४६.५५ टक्के डिजिटायझेशन नोंदवले गेले आहे. विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) BLOs च्या माध्यमातून हे पुनरिक्षण काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.