पर्यावरण दिनानिमित्त नुरीया फैजाने सादिक ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
मदरसा परिसरात वृक्षारोपण करताना मान्यवर
मदरसा परिसरात वृक्षारोपण करताना मान्यवर

 

नुरीया फैजाने सादिक ट्रस्ट आणि मदसा फैजाने गरीब नवाज संचालित मदरशामध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण बचावाचा संदेश देत झाली. विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. शहर-ए-खतीब हाफीज हिसामोद्दीन खतीब कार्यक्रम अध्यक्षस्थानी होते. 

या वेळी महापालिका उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, किरण बोडडे, संध्या धोपावकर, शाकीब भुरे, मुख्याध्यापिका रेहाणा अन्सारी, कौसर शेख, अन्सारी अफरीन, रफीक साबीर, मुबीन मेमन, रिजबान खान, रजा खतीब, कादिर शेख, नाजिम शेख, शादाब कोकणी, मुशिरुद्दीन शेख, आसिफ शेख, मौलाना मो. अब्दक काबीज अझहरी, सुनील गते, सुरेश राठोड, राखी गहिले, रामदास बेंडकुळे आदी उपस्थित होते.

दरम्यान मदरशा परिसरासह इतर ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज अधोरेखित करण्यात आली. उपक्रमाअंतर्गत सुमारे ५० विद्यार्थ्यांना रोपे देण्यात आली.